agriculture news in marathi, District Development Officer visit farms | Agrowon

जिल्हाधिकारी पोचले शेतबांधावर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी, योजनांची माहिती, कृषी विभागाचा समन्वय, मागेल त्याला शेततळे योजना आदी अनेक योजनांची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट तालुक्‍यातील सहा गावांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले. शेतकऱ्यांना असलेल्या समस्यांबाबत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. 

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी, योजनांची माहिती, कृषी विभागाचा समन्वय, मागेल त्याला शेततळे योजना आदी अनेक योजनांची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट तालुक्‍यातील सहा गावांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले. शेतकऱ्यांना असलेल्या समस्यांबाबत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. 

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजनांपैकी अनेक योजना कागदोपत्रीच शेतकऱ्यांपर्यंत पोचतात. परिणामी, शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांपर्यंत योजना पोचाव्यात, त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात भेटी देण्याचे नियोजन केले आहे. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुसद तालुका निवडला. तालुक्‍यातील यंत्रणेकडून आढावा घेतल्यानंतर त्यांनी बांधाकडे आपला मोर्चा वळविला.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी गायमुखनगर, आसार पेंड, इंदिरानगर, कोंडइ, हर्षी, वेणी, वालतूर, आडगाव आदी ठिकाणी भेटी दिल्या. भेटीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. निवासी शासकीय शाळा, रेशीम शेती, फुलशेती, शेततळ्याची पाहणी, शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रकल्पाला भेट, निवासी शासकीय आश्रमशाळेतील सोयीसुविधांची पाहणी, बचत गटांची दालमिल, शेळीपालन प्रकल्प, विहीर पुनर्भरण कार्यक्रम, केळी पीकपाहणी, सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प, उन्नतशेती समृद्ध शेतकरी अभियान आदी कामांची पाहणी केली. या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी आपली गऱ्हाणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यांच्या अडचणी सोडवीत त्यावर तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी यंत्रणेला दिले. 

पहिलीच व्हिजिट
एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन एकाचदिवशी इतक्‍या गावांना भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधल्याने शेतकऱ्यांनीही बिनधास्तपणे आपल्या समस्या मांडल्या.

 

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...