शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर जिल्ह्याची आघाडी 

किसान सन्मान निधी योजनेत जिल्ह्याची आघाडी
किसान सन्मान निधी योजनेत जिल्ह्याची आघाडी

नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी प्रतिकुटुंब या योजनेतून सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे. शेतकरी कुटुंबांच्या याद्या अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील एक हजार ६०१ महसुली गावांत पाच लाख २२ हजार २३८ पात्र शेतकरी असून, त्यांपैकी कालअखेर तब्बल तीन लाख १२ हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या. 

परिपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कामकाज सुरू आहे. जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील व तहसीलदार एफ. आर. शेख काम पाहत आहेत. कालबद्ध कार्यक्रमानुसार विहित कालावधीत कार्यवाही काटेकोरपणे पूर्ण करा, असा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी महसूल व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना दिला आहे. 

जिल्ह्यामध्ये एकूण बारा लाख सातबारा उतारे आहेत, तर ‘आठ-अ’ खातेदारांची संख्या नऊ लाख ५० हजार २९० आहे. त्यातील अल्प-भूधारकांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांची संख्या जवळपास पाच लाख २२ हजार २३८ आहे. एनआयसीवर शेतकरी संख्या अपलोड करण्यामध्ये जिल्ह्यात पारनेर तालुक्‍याने आघाडी घेतली असून, २८ हजार ६५१ शेतकऱ्यांची यादी अपलोड केली आहे. 

तालुकानिहाय पात्र शेतकरी : नगर - ५४२४१, नेवासे - ५१४३७, पाथर्डी - ४७३४१, शेवगाव - ३७९००, संगमनेर - ४०११९, अकोले - ३३१२८, श्रीरामपूर - १४४५२, राहुरी - ३०५२२, कोपरगाव - ३७१४५, राहाता - २६३९३, श्रीगोंदे - ५१४४५, पारनेर - ४०२१५, कर्जत - २३७००, जामखेड - ३४२००

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जिल्हा राज्यात अव्वल आहे. अल्पभूधारकांच्या याद्या अपलोड करण्यासाठी गुरुवारपर्यंत (ता. २८) मुदत असली, तरी मुदतीपूर्वीच काम पूर्ण होईल.  - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com