agriculture news in marathi, District Marketing Officer of Akola and Nagar suspended | Agrowon

अकोला, नगरचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी निलंबित
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई : किमान आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदीच्या बाबतीत चालढकल करणाऱ्या अकोला आणि नगरच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना उदासीनता चांगलीच भोवली आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी स्वतः बोलून खात्री केल्यानंतर पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधित दोन्ही जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यााचे आदेश दिले.

मुंबई : किमान आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदीच्या बाबतीत चालढकल करणाऱ्या अकोला आणि नगरच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना उदासीनता चांगलीच भोवली आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी स्वतः बोलून खात्री केल्यानंतर पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधित दोन्ही जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यााचे आदेश दिले.

सध्या हमीभावाने उडीद, मूग आणि सोयाबीनची खरेदी सुरू आहे. सोयाबीनची १२६ केंद्रे, मुगासाठी ८६ आणि उडीद खरेदीसाठी ८९ हमीभाव केंद्रे सुरू आहेत. खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी येत असलेल्या शेतीमालामध्ये आर्द्रता १४ टक्क्यांपासून ते २० टक्के इतकी आढळून येत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कमाल १२ टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. आर्द्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मूग आणि उडदाची खरेदी कमी प्रमाणात होत आहे. तसेच विक्रीसाठी येत असलेला शेतीमाल एफएक्यू दर्जाचा नसल्याचे पणन महामंडळाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे खरेदीला गती नसल्याचे समजते.

मात्र काही जिल्ह्यांत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या स्तरावर शेतमाल खरेदीत उदासीनता आढळून येत आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे याबाबतच्या तक्रारी आल्या होत्या. बुधवारी त्यांनी स्वतः याची खातरजमा करून घेतली. अकोला आणि नगर जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मंत्री देशमुख यांनी स्वतः फोन केले. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांना नोंदणीनंतर खरेदी केंद्रावर कधी शेतीमाल आणायचा याचा मोबाइल संदेश आला नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी शेतीमालाची नोंदणी करून महिना झाला तरी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.

शेतीमाल खरेदीच्या बाबत ते गंभीर दिसून येत नाहीत हे लक्षात आल्याने मंत्री देशमुख यांनी ही बाब गंभीरपणे घेतली. तसेच अकोला आणि अहमदनगरच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना निलंबित करावे, असे आदेश त्यांनी पणन महामंडळाच्या वरिष्ठांना दिले. ही कारवाई तातडीने करावी असे निर्देश देण्यात आल्याचे पणन विभागातील उच्चपदस्थांनी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात कोणी शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी बाबत चालढकल केल्यास अशाच स्वरूपाच्या गंभीर कारवाईला सामोरे जावे लागू सकते अशी चर्चा आहे.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...