agriculture news in Marathi, District marketing officer says, include that company in black list, Maharashtra | Agrowon

‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका : जिल्हा मार्केटींग अधिकारी
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

शेतकऱ्यांची अडवणूक होईल अशा पद्धतीने सोयाबीनची तपासणी केली गेल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीतच आढळून आले. त्यांच्या आदेशानुसारच अहवाल नाफेडला पाठविण्यात आला असून ‘स्टार अॅग्री’ या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. 
- वाय. ई. सुमठाणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, लातूर

लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीतच खरेदी केंद्रावरील ग्रेडरने ‘रिझेक्ट’ केलेले सोयाबीन ‘सलेक्ट’ झाले होते. या प्रकरणी श्री. देशमुख यांनी याचा अहवाल नाफेडला सादर करण्याचे आदेश जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले होते.

नुसार येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी आपला सविस्तर अहवाल नाफेडला सादर केला असून, यात ‘स्टार अॅग्री’ या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. या कंपनीने जिल्ह्यात सध्या पाच केंद्रांवर ‘ग्रेडर’ नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण ‘स्टार अॅग्री’ कंपनीला भोवणार असल्याचे दिसत आहे.

शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कशी अडवणूक केली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ८) येथे घेतला होता. श्री. देशमुख यांनी येथील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राला भेट दिली होती.

त्यावेळी केंद्रावरील ग्रेडरने ‘रिझेक्ट’ केलेल्या सोयाबीनची थप्पी केंद्रात लावण्यात आली होती. यात श्री. देशमुख यांना शंका आली. त्यांनी या थप्पीमधील एका पोत्यातील सोयाबीन काढायला सांगितले. ते सोबायीन पुन्हा मशिनवर मोजायला लावले. तर त्यात हे सोयाबीन ‘सलेक्ट’ झाले होते. खुद्द मंत्र्यांनीच हा अनुभव घेतला होता. त्यामुळे दररोज या केंद्रावर कशा पद्धतीने सोयाबीनची खरेदी केली जात असावी हेही श्री. देशमुख यांच्या लक्षात आले होते. 

हा प्रकार घडल्यानंतर श्री. देशमुख यांनी या सर्व प्रकाराचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले होते. यातून येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी आपला अहवाल नाफेडला सादर केला आहे. यात स्टार अॅग्री या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली आहे. 

अन्याय होणार नाही ः सहकारमंत्री
शासन तेलबिया नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेत आहे. चांगल्या बाजार समित्या उद्‍ध्वस्त होतील अशी भीती बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी यावेळी व्यक्त केली. यावर श्री. देशमुख म्हणाले, या करीता एक समिती गठीत केली आहे. त्या समितीचा अभ्यास सुरू आहे. अहवाल आल्यानंतर हरकती मागविण्यात येतील. बाजार समित्या उद्‍ध्वस्त व्हाव्यात हा आमचा हेतू नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. कशात फायदा आहे त्याचा विचार होईल.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...