agriculture news in Marathi, The District Milk Union has filed cases against 127 milk companies | Agrowon

सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे थकवणाऱ्या १२७ दूध संस्थांवर खटले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी खरेदीसाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून गाव पातळीवरील सहकारी दूध संस्थांनी घेतलेली रक्कम वसूल करण्यासाठी संघाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. तीन कोटी ७३ लाख रुपयांच्या वसुलीसाठी १२७ संस्थेच्या अध्यक्ष व सचिव विरोधात संघाच्या वतीने फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. 

सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी खरेदीसाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून गाव पातळीवरील सहकारी दूध संस्थांनी घेतलेली रक्कम वसूल करण्यासाठी संघाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. तीन कोटी ७३ लाख रुपयांच्या वसुलीसाठी १२७ संस्थेच्या अध्यक्ष व सचिव विरोधात संघाच्या वतीने फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. 

वारंवार मागणी करूनही दूध संघाची अनामत रक्कम बुडविणाऱ्या संस्थांकडील वसुलीसाठी सहकार न्यायालयात दावे दाखल करून १२ टक्के व्याजासह अनामत रक्कम वसूल केली जात आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने सहकार न्यायालयात ५४४ संस्थांवर सहकार कायदा कलम ९१ अन्वये वसुली दावे दाखल करण्यात आले आहेत. या दाव्यांतून पाच कोटी ७३ लाख रुपये संघाला मिळणार आहेत. दाखल केलेल्या दाव्यांपैकी ३४९ संस्थांच्या बाबतीतील चार कोटी ५१ लाख रुपयांच्या दाव्यांचा निकाल संघाच्या बाजूने लागला आहे. 

दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून या रकमेवर १२ टक्के व्याज आकारण्यात येत असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी दिली. मुदतीत रक्कम न भरणाऱ्या १४९ संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांच्या जमिनीवर बोजा चढविण्यात आला आहे. अन्य प्रकरणांतही बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू आहे. संघाच्या वसुली विभागामार्फत प्रत्येक तालुक्‍यासाठी एक वसुली अधिकारी नियुक्त करण्यात आला असून, आतापर्यंत एक कोटी २१ लाख रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक मुळे यांनी दिली.

दूध संघाने ज्या विश्‍वासाने संस्थांना अनामत रक्कम दिली होती. त्या विश्‍वासाने या रकमेची वेळेत परतफेड आवश्‍यक होती. ही रक्कम वेळेत आली असती तर अन्य गरजू संस्थांना या रकमेचे वाटप करणे शक्‍य झाले असते. त्यामुळेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई हाती घेण्यात आली आहे. 
- प्रशांत परिचारक, आमदार तथा, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा सहकारी 
दूध संघ

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...