agriculture news in marathi, In the district of Pune, Grape in problem | Agrowon

पुणे जिल्ह्यात वटवाघळांचा द्राक्षांवर डल्ला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणे : वटवाघळांची वसतिस्थाने असणारी वड, पिंपळांची झाडे माेठ्या प्रमाणावर तुटल्यानंतर सैरभैर झालेल्या वटवाघळांनी भक्ष्यासाठी आपला माेर्चा द्राक्षांकडे वळविला आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या द्राक्षांवर वटवाघळे डल्ला मारत असून, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या हल्ल्यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नव्या समस्येला ताेंड द्यावे लागत आहे. वटवाघळांमुळे द्राक्षांच्या लाखाे रुपयांच्या नुकसानीबराेबरच, द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध क्लुप्त्यांसाठी अधिकचा खर्च करावा आहेत.

पुणे : वटवाघळांची वसतिस्थाने असणारी वड, पिंपळांची झाडे माेठ्या प्रमाणावर तुटल्यानंतर सैरभैर झालेल्या वटवाघळांनी भक्ष्यासाठी आपला माेर्चा द्राक्षांकडे वळविला आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या द्राक्षांवर वटवाघळे डल्ला मारत असून, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या हल्ल्यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नव्या समस्येला ताेंड द्यावे लागत आहे. वटवाघळांमुळे द्राक्षांच्या लाखाे रुपयांच्या नुकसानीबराेबरच, द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध क्लुप्त्यांसाठी अधिकचा खर्च करावा आहेत.

हवामान बदल, कीड-राेगांचा प्रादुर्भाव, बाजारभाव आदी विविध समस्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण असताना, आता वटवाघळांचा हल्ला ही नवीन समस्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह बारामती, इंदापूर, दाैंड आदी तालुक्यांमधील द्राक्ष बागांवर वटवाघळांचा हल्ला वाढला आहे.

याबाबत बाेलता हापुसबाग (ता. जुन्नर) येथील शेतकरी हेमंत भास्कर म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदादेखील द्राक्षांवर वटवाघळांचा हल्ला सुरू झाला आहे. द्राक्षांमध्ये गाेडी वाढली, की वटवाघळांचा हल्ला सुरू होताे. आंबट द्राक्षांना वटवाघळे ताेंडदेखील लावत नाहीत. सध्या तालुक्यातील द्राक्षकाढणीचा हंगाम सुरू झाला असून, वटवाघळे बागांमध्ये येण्यास सुरवात झाली आहे. ’’

‘‘वटवाघळांपासून द्राक्षबागा वाचविण्यासाठी बागांभाेवती जाळ्या, साड्या लावणे अशा उपाययाेजना करत आहे. मात्र काही प्रमाणात हल्ला राेखला जाताे. पण वटवाघळे बागांच्या वरून प्रवेश करतात. यामुळे रात्रीच्या गस्तीसाठी मजूर ठेवावे लागतात. तर फटाके उडविणे, माेठ्याने गाणी लावणे आदी उपाय करत आहे. यासाठी माेठा खर्च हाेत आहे.    

दरम्यान वटवाघळांपासून द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी बागांना जाळ्या लावतात. मात्र जाळ्यांमध्ये वटवाघळे अडकल्याने त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे ती दगावतात. दरम्यान वटवाघळे आणि द्राक्ष दाेन्हीही वाचविण्यासाठी बागांभाेवती आणि काही उंचीवर साड्या लावाव्यात, असे आवाहन वटवाघूळ अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी केले आहे. तर वटवाघळांना वन्यजीव कायद्या अंतर्गत संरक्षित केले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वन विभागाकडून मिळू शकते.

सध्या वटवाघळांचा समावेश हा कुरतडणाऱ्या प्राण्यांमध्ये असल्यामुळे त्यांच्या द्वारे हाेणारे नुकसान देण्यास कायदेशीर अडचणी निर्माण हाेत आहे, असेही डॉ. गायकवाड यांनी नमूद केले.

इतर बातम्या
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...