दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत प्रवास ः रावते

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत प्रवास ः रावते
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत प्रवास ः रावते

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे. शासनाने दुष्काळसदृश म्हणून नुकत्याच जाहीर केलेल्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. राज्य शासनाने नुकतेच दुष्काळसदृश तालुक्यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात एसटी महामंडळही आपले योगदान देत आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्के इतकी सवलत देण्यात येते. आता शासनाने दुष्काळसदृश म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत १०० टक्के इतकी देण्यात येईल. ही संपूर्ण सवलत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार असून, त्यासाठी महामंडळावर साधारण ८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राज्यातील साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा लाभ मिळेल, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले. मंत्री श्री. रावते म्हणाले, पावसाअभावी अन्नदाता शेतकरी सध्या अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृश परिस्थ‍ितीमुळे अडचणीत आहेत. शिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एक प्रकारे ते एसटीचे अन्नदाते आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे, हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पाससाठी १०० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com