agriculture news in marathi, Diwakar Rawate criticizes BJP for allowing incomming from other parties | Agrowon

भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावते
वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष आहे. इतर पक्षांतून माणसे घ्यायची व निवडणुका लढवायचे काम भाजप करीत असल्याची टीका शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

नागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष आहे. इतर पक्षांतून माणसे घ्यायची व निवडणुका लढवायचे काम भाजप करीत असल्याची टीका शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व विदर्भातील जिल्हाप्रमुख व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका रावते यांनी घेतल्या. यात भंडारा, गोंदिया, नागपूर, नागपूर ग्रामीण या भागातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, "भाजप हा दुसऱ्या पक्षांतील उमेदवार आयात करणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षात लोक नसल्याने दुसऱ्यांच्या पक्षांतील लोक आयात करतात. त्यांच्या भरवशावर काहीही करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. कर्नाटकमध्ये लोकशाहीविरोधी कृती करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न झाला; परंतु न्यायालयाच्या सजगतेमुळे तो असफल ठरला. भाजपच्या या कृतीवर सर्व वर्तमानपत्रांतूनही टीका झाली. या लोकशाहीविरोधी कृतीच्या विरोधात वर्तमानपत्रांच्या संपादकांनी घेतलेली ही भूमिका स्वागतार्ह आहे.'' ज्या चलनी नोटांवर देश चालतो, त्या नोटा फाडणे हा देशद्रोह असल्याचे सांगून दिवाकर रावते यांनी किरीट सोमय्यांच्या कृतीवर टीका केली.

एसटी भाडेवाढीची शक्‍यता
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या डिझेल भाववाढीमुळे एसटी भाडेवाढ करण्याचे संकेत रावते यांनी दिले. गेल्या वर्षी व आताच्या डिझेलच्या दरात मोठी तफावत आहे. यामुळे एसटी महामंडळाला दरवर्षी ४६० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सध्या परदेशात आहेत, ते आल्यानंतर या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...