द्रमुकचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांचे निधन

द्रमुकचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांचे निधन
द्रमुकचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांचे निधन

नवी दिल्ली : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज (मंगळवार) चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांचे निधन झाले. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार सुरु होते. रक्तदाब जाणवू लागल्याने त्यांना 28 जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. करुणानिधी यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.

दरम्यान, करुणानिधी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य काही नेत्यांनी भेट घेतली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली होती.

करुणानिधी यांची राजकीय कारकीर्द : * करुणानिधी यांनी पाचवेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. पाचवेळा मुख्यमंत्री होणारे आणि द्रमुकचे प्रमुखपद सलग 50 वर्षे सांभाळणाऱ्या एम. करुणानिधी यांचा राजकीय प्रवास अनेक अडचणीतून व्यतित झाला होता. * द्रविड मुनेत्र कळघमचे (द्रमुक) सर्वेसर्वा आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी विद्यार्थिदशेत "पानागल अरासर' या अभ्यासक्रमातील पुस्तकाने प्रभावित झाले होते. द्रमुकचे पूर्वसुरी असलेल्या जस्टिस पार्टीचे संस्थापक पानागल अरासर यांचे ते चरित्र. * तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद पाचवेळा भूषविणाऱ्या आणि तब्बल अर्धा दशक द्रमुकचे सर्वेसर्वा राहिलेल्या करुणानिधींचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. करुणानिधींनी सातवीतच स्वत:ची राजकीय विचारसरणी मांडणारे हस्तलिखित प्रकाशित केले. तसेच त्यांनी 14 व्या वर्षीच हिंदीविरोधी आंदोलनातही सहभाग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com