भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ः राजू शेट्टी

भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ः राजू शेट्टी
भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ः राजू शेट्टी

खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करून जबाबदारी संपत नाही. तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, सध्या सरकारमध्ये संवेदना असलेली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारी माणसे नाहीत. सरकारने दुर्लक्ष केले तरी, भावानो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. लोकसहभागातून सुरू झालेली छावणी सारा दुष्काळ हटेपर्यंत बंद पडू देणार नाही.''असे सांगताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज गंभीर दुष्काळाशी सामना करणाऱ्या पाथर्डी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

नगरसह राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. मात्र जनावरे जगवण्याबाबत अजून सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, मात्र खोजेवाडी (ता. पाथर्डी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोकसहभागातून जनावरांची छावणी सुरू केली आहे. ही यंदा सुरू झालेली राज्यातील पहिली छावणी आहे. या छावणीला आज खासदार शेट्टी यांनी भेट देऊन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला, गऱ्हाणी ऐकून घेतली. संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, शिवसंग्राम संघटनेचे नेते डॉ. कृषिराज टकले, संतोष रोहम, प्रताप पटारे, साईनाथ घोरपडे, शरद मरकड आदी उपस्थित होते. 

शेट्टी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘दुष्काळ पडला आहे हे सरकारने जाहीर करून सांगायची गरज नव्हती, सवलती देणार कधी याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. शेतकऱ्यांना आधार देण्याएेवजी उद्योगपतीच दुष्काळाच्या नावाखाली लूट करत आहेत, असा आरोप केला.

मदत सोडा, पाणीही अडवलं जातेय  ‘‘जेवाडीतील छावणीला जवळच असलेल्या कासार पिंपळगाव येथून टॅंकरने पाणी आणले जातेय, मात्र मदत सोडा येथील काही लोकांनी छावणीला येणारे पाणी अडवलेय जातेय. दोन दिवसांपासून छावणीतील जनावरे पाण्यावाचून तडफडत आहेत. फळबागा जगवण्यासाठी विकतचे पाणी घेतो, तेही घेऊ दिले जात नाही. जिल्हा बॅंकेकडून कर्जापोटी उसाचे पैसे कापले जात आहेत’ शेतकऱ्यांनी शेट्टी यांच्यासमोर व्यथा मांडल्या. ‘‘आता कोण पाणी आडवतो तेच बघतो.’’ या शब्दात शेतकऱ्यांना शेट्टी यांनी धीर दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com