agriculture news in marathi, Do not drink in 'Sina-Madha' Sector survey demand | Agrowon

‘सीना-माढा'मध्ये न भिजणाऱ्या क्षेत्राच्या सर्वेक्षणाची मागणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

सोलापूर : सीना-माढा सिंचन योजनेअंतर्गत माढा आणि उपळाई बुद्रुक भागातील न भिजणारे क्षेत्र सिंचन लाभक्षेत्रात आणण्यासाठी या भागाचे सर्वेक्षण करण्यात यावे, तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना दिली, अशी माहिती माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

सोलापूर : सीना-माढा सिंचन योजनेअंतर्गत माढा आणि उपळाई बुद्रुक भागातील न भिजणारे क्षेत्र सिंचन लाभक्षेत्रात आणण्यासाठी या भागाचे सर्वेक्षण करण्यात यावे, तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना दिली, अशी माहिती माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

सीना-माढा सिंचन योजनेच्या माढा, उपळाई बुद्रुक, रोपळे, वडाचीवाडी या परिसरातील गावांमध्ये बंद पाइपलाइन प्रणालीद्वारे (पीडीएन) लाभक्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. या ठिकाणी डाव्या बाजूच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळते. परंतु उजव्या बाजूच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने हे क्षेत्र पाण्यापासून वंचित राहत आहे. उजव्या बाजूच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ग्रॅव्हिटीने (नैसर्गिक उताराने) पाणी पोचेल, तिथपर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी त्या भागाचा तातडीने सर्व्हे करावा, अशी मागणी शिंदे यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानुसार रजपूत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

त्याचा प्रस्ताव सादर होताच त्यास तातडीने मंजुरी देण्यात येईल, असे मुख्य अभियंत्यांनी मान्य केले असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. या परिसरातील पाझर तलावामध्ये ग्रॅव्हिटीने (नैसर्गिक उताराने) पाणी जाते, त्या ठिकाणचा पाझर तलाव भरण्यासाठी सध्याच्या सुरू असलेल्या पाइपलाइनमधून व्हॉल्व्ह काढून पुढील काळात शेतीसाठी पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेदेखील शिंदे यांनी सांगितले.

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...