बोंड अळीची नुकसानभरपाई मिळेना

बोंड अळीची नुकसानभरपाई मिळेना
बोंड अळीची नुकसानभरपाई मिळेना

भांबेरी, जि. अकोला ः मागील हंगामात कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लागवडीवर केलेला खर्चसुद्धा निघाला नव्हता. असे असतानाही यंदा पुन्हा कपाशीवर बोंड अळी अाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्या अाहेत. गतवर्षी बोंड अळीच्या नुकसानीची मदत म्हणून तेल्हारा तालुक्यात २७ कोटींची मदत जाहीर झाली. मात्र, परंतु त्यातील केवळ साडेसात कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात अाला अाहे. उर्वरित शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

तेल्हारा तालुक्यात बोंड अळीची मदत जाहीर करण्यात अाली अाहे. इंग्रजी वर्णमालेप्रमाणे गावातील शेतकऱ्यांना मदत देण्यात येत अाहे. अातापर्यंत ‘एल’ अक्षराच्या गावापर्यंत मदत वाटप करण्यात अाली अाहे. परंतु एबीसी या इंग्रजी अक्षरानुसार वाटप करत असताना अटकळी, भांबेरी, मनब्दा, पाथर्डी येथील शेतकऱ्यांना वगळून दानापूर गावातील सर्व शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान प्राप्त झाले अाहे. संबंधित गावातील शेतकऱ्यांनी बोंड अळीचे अनुदान मिळण्यासाठी लागणारे सर्व अावश्यक कागदपत्रे अापापल्या भागातील तलाठ्याजवळ मुदतीच्या अात दिले. तलाठ्यांनी पाहणी करून सर्व प्रोटोकाॅल पूर्ण केले. तरीही अद्यापही अनुदान का मिळाले नाही, असा प्रश्न उपस्थित केल्या जात अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com