agriculture news in marathi, Do not give crush licensing to the defaulter factory | Agrowon

बाकी न देणाऱ्या कारखान्यास गाळप परवाने देऊ नका
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

सातारा : मागील हंगामात विनापरवाना ऊस गाळप करणाऱ्या, तसेच गतहंगामातील बाकी ऊस बिल न देता सुरू केलेल्या कारखान्यास गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेने साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकतेच साखर आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, गतहंगामातील उसाला सातारा जिल्ह्यात अनेक कारखान्यांनी ४०० ते ६०० रुपयांने कमी ऊस बिल दिले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

तसेच रयत सहकारी कारखान्याने मागील हंगामातील जवळपास १४ कोटी रुपये बुडविले असून, गाळप परवाना नसतानाही ऊस गाळप केले आहे. मागील बाकी मिळेपर्यंत रयत कारखान्यास गाळप परवाना देऊ नये.

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दोन प्रकारे ऊस बिल देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. साखर कारखान्यांनी मागील हंगामातील ऊस बिल द्यावे तसेच या हंगामातील पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय कारखान्यास गाळप परवाने देऊ नका; अन्यथा साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या वेळी संस्थापक अध्यक्ष बी. जी. काका पाटील, जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला आदी उपस्थित होते.

टॅग्स

इतर बातम्या
मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भावपरभणी : सलग तीन आठवडे  पावसाचा खंड आणि...
चाळीतल्या कांद्याचे काय होणार?कांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...
रोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिकालहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे...
नांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
पुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...
सीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...
'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...
‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...
वनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
मराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...
नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...