agriculture news in marathi, Do not grab the land by discussing 'farming.' | Agrowon

‘खेती पे चर्चा’ करून जमिनी बळकावू नका
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात ‘चाय पे चर्चा’ केली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत असे धोरण राबविण्याचे आश्वासन दिले होते. पण जेथे त्यांनी ही चर्चा केली तेथेच सर्वांत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या हातून ‘कप’ गेला. आता ते ‘खेती पे चर्चा’ करणार आहेत. यात शेतकऱ्यांच्या हातून जमीन जाऊ नये हीच अपेक्षा आहे, अशी उपरोधिक टीका शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे गुरुवारी (ता. १५) केली.

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात ‘चाय पे चर्चा’ केली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत असे धोरण राबविण्याचे आश्वासन दिले होते. पण जेथे त्यांनी ही चर्चा केली तेथेच सर्वांत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या हातून ‘कप’ गेला. आता ते ‘खेती पे चर्चा’ करणार आहेत. यात शेतकऱ्यांच्या हातून जमीन जाऊ नये हीच अपेक्षा आहे, अशी उपरोधिक टीका शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे गुरुवारी (ता. १५) केली.

 या वेळी त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हिरवा गॉगल घातल्याने त्यांना सर्व शिवार हिरवेगार दिसत आहे, असा टोलाही लगावला.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठवाड्यात गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मदतीची घोषणा देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले आहे. शेतातील कसपट काढण्यासाठी दहा हजार रुपये लागणार आहेत. शासन मात्र दोन हजार चारशे रुपये देणार आहे. शासन शेतकऱ्यांची चेष्ठा करीत आहे. कर्जमाफीचे २३ हजार कोटी रुपये बँकेत जमा केले असे शासन सांगत आहे. पण हे कोणाच्या खात्यावर गेले हे मात्र सांगत नाही. भूलथापा देऊन हे शासन सत्तेवर आले आहे. येत्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्र्यांना झो़डपून काढण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

साखरेचे भाव पाडण्याचा प्रकार संशयास्पद आहे. व्यापाऱ्यावरील स्टॉकवरील नियंत्रण उठविल्यानंतर हे भाव पडले आहेत. त्यामुळे शासनाने गोदाम तपासून दोन महिन्यांत झालेली साखरेची खरेदी- विक्रीची चौकशी करावी अशी मागणी आहे. कारखान्यांनी ठरलेली उचल दिलीच पाहिजे या करिता १७ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत संघटना सोडून गेल्याने संघटनेला काहीच फरक पडला नाही. आता त्यांची दृष्टी बदलली आहे. हिरवा गॉगल त्यांनी घातला आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाऐवजी सर्व शिवार हिरवे दिसू लागले आहे. सर्वत्र आनंदी आनंद दिसत आहे, अशी टीका श्री. शेट्टी यांनी या वेळी केली.

 

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...