agriculture news in marathi, Do not remember to Vijayadada when stabilized? : Sharad Pawar | Agrowon

विजयदादा यांना तेव्हा स्थिरीकरण आठवले नाही का? : शरद पवार
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

सोलापूर : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी स्वाभिमानाची लढाई लढत राजकारण केले. आम्ही विजयदादा यांना मोठी संधी दिली. बांधकाममंत्री, साखर संघाचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्र्यापासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेकदा संधी दिली. विरोध असतानाही सर्व पदे दिली. त्या वेळेस त्यांना स्थिरीकरणाचे डोक्यात आले नाही का? आताच स्थिरीकरण आठवते आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १९) नातेपुते येथे मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशावर पहिल्यांदाच मत व्यक्त केले. 

सोलापूर : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी स्वाभिमानाची लढाई लढत राजकारण केले. आम्ही विजयदादा यांना मोठी संधी दिली. बांधकाममंत्री, साखर संघाचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्र्यापासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेकदा संधी दिली. विरोध असतानाही सर्व पदे दिली. त्या वेळेस त्यांना स्थिरीकरणाचे डोक्यात आले नाही का? आताच स्थिरीकरण आठवते आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १९) नातेपुते येथे मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशावर पहिल्यांदाच मत व्यक्त केले. 

माढा मतदारसंघातील उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ नातेपुते (ता. माळशिरस) येथे आयोजित प्रचार सभेत पवार बोलत होते. उमेदवार संजय शिंदे, आमदार अॅड. रामहरी रुपनवर, रामदास देशमुख, अॅड. सुभाष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत जाधव, संतोष पवार आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘ज्या घराण्यावर आजचे पंतप्रधान टीका करतात, त्या इंदिरा गांधी यांनी देशाला स्थिर सरकार दिले. देशाची प्रतिष्ठा वाढवली. राजीव गांधी यांनी आधुनिकतेची कास धरल्याने आज देशात तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यांनी देशासाठी योगदान दिले. मात्र विकासावर आणि स्वतःच्या कामावर बोलण्यापेक्षा वैयक्तिक टीकेवरच या प्रधानसेवकाचा भर राहिला आहे. ‘‘

त्यांना आमच्या कुटुंबाची काळजी लागली आहे. स्वतःचे कुटुंब नसल्याने त्यांना एकीचे महत्त्व समजणार नाही. पण आमच्यावर आईचे संस्कार आहेत. माझ्या घरात मुलीचे लग्न झाले आहे. आम्ही जिवाभावाने एक आहोत. त्यामुळे मोदींनी दुसऱ्याच्या घरात वाकून बघायचे बंद करावे, असा टोलाही पवार यांनी लगावला. 

या वयात पाय, मांड्या बघायची वेळ नको

मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशावर पवार यांनी तीव्र शब्दांत टीका केली. इथल्या नेत्यांनी हाफ पँट, डोक्यावर काळी टोपी घातली आहे. मात्र, या वयात तुमचे पाय-मांड्या बघायची वेळ येऊ देऊ नका, असा उपरोधिक टोलाही पवार यांनी मोहिते पाटील यांना लगावला.

इतर बातम्या
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षेवर होतोय...वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत...
नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी...नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर...
सिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४...नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अधिग्रहित विहिरींना...उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
हिंगोली : टॅंकरद्वारे ५६ हजार...हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर...
अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शनअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
चारा, पाण्याची व्यवस्था करा : आमदार...सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी : ‘एकीचे बळ मिळते फळ’...
सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरासोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...