पाण्याचे राजकारण नको : उदयनराजे

पाण्याचे राजकारण नको : उदयनराजे
पाण्याचे राजकारण नको : उदयनराजे

सोलापूर  : ‘‘आपण पाण्यावरून कधीही राजकारण केले नाही. मुळात पाण्यावरून कोणीच राजकारण करु नये, या मताचा मी आहे. हे पाणी ज्यांच्या हक्काचे त्यांना ते दिलेच पाहिजे, यात कसले राजकारण करता,’’ असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी पंढरपुरात केला. 

खासदार उदयनराजे गुरुवारी (ता.१४) पंढरपूर, सांगोला दौऱ्यावर होते. सांगोल्यातील लोटेवाडीतील चारा छावण्याला भेट दिली. तिथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. सांगोला दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रात्री पंढरपुरात विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची बाजू घेत राजेशाही काळातील निर्णयाची आठवण करून दिली. सरकारने शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या आर्थसंकल्पात अधिक तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

विठ्ठलाला काय साकडे घातले आणि सध्या पाण्यावरून राजकारण केले जाते काय, असे विचारले असता भोसले म्हणाले, ‘‘मी कुठलेही राजकारण करण्यासाठी बसलो नाही. जनतेची सेवा मला करायची आहे. सध्या लोकशाही आहे. लोकशाहीचे तुम्ही सर्व राजे आहात. त्यामुळे आपणच दुष्काळासंबंधी निर्णय घ्यायला पाहिजे. आज राजेशाही अस्तित्वात असती, तर दुष्काळ निवारणाचा निश्‍चितच आपण निर्णय घेतला असता.’’ 

मंदिर समितीच्या वतीने उदयनराजे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, दीपक वाडदेकर, बंदी वाघ, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर आदी उपस्थित होते. 

शेतकरी सक्षम, तरच देश महासत्ता 

आजही बॅंकांत उद्योजकांचे स्वागत होते. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची हेटाळणी होते. जोपर्यंत या देशातील शेतकरी सधन व सक्षम होणार नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता बनणार नाही. ८० टक्के जनता ही शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. २० टक्के जनता ही उद्योग-व्यवसायात आहे. त्यांचा उत्पादित माल विकत घेण्यासाठी ८० टक्के जनतेची आर्थिक क्षमता वाढणे गरजेचे आहे. शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे. तो कोलमडला तर देशाचे तुकडे होतील, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com