agriculture news in marathi, Do your work as a reminder of a career | Agrowon

सरपंचांनी कारकीर्दचे स्मरण होईल असे काम करावे : चंद्रकांत दळवी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : सरपंचांनी नैतिकता जपत निरपेक्ष व निपक्ष:पातीपणे काम करावे, त्यातून गावावर चांगले संस्कार होतील, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारे यशवंत सरपंच पुरस्कार, यशवंत ग्रामपंचायत जिल्हास्तर आणि तालुकास्तर पुरस्कार तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण कोल्हापूर येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर : सरपंचांनी नैतिकता जपत निरपेक्ष व निपक्ष:पातीपणे काम करावे, त्यातून गावावर चांगले संस्कार होतील, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारे यशवंत सरपंच पुरस्कार, यशवंत ग्रामपंचायत जिल्हास्तर आणि तालुकास्तर पुरस्कार तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण कोल्हापूर येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ग्रामसेवक व सरपंच यांनी समन्वयाने काम केल्यास ग्रामपातळीवर फार मोठे परिवर्तन होईल. पुढील वर्षापासून अत्यंत चांगला समन्वय असणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांनाही जिल्हा परिषदेने पुरस्कार जाहीर करावे, असे सांगितले. यावेळी त्यांनी लोकांमधून थेट सरपंचांची निवड करणे हा शासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण व उत्कृष्ट निर्णय असून मिळालेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता मोहीम हे प्रश्न प्राधान्याने हाताळल्यास लोकांच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील.

२०१६-१७ मध्ये जिल्हा स्थरावर यशवंत ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हातकणंगले तालुक्‍यातील शिरोली (पुलाची) ग्रामपंचायतीचा, द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल आजरा तालुक्‍यातील लाटगाव ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला. तसेच २०१७-१८ मध्ये जिल्हा स्तरावर आजारा तालुक्‍यातील उत्तूर ग्रामपंचायतीसह कागल तालुक्‍यातील खडकेवाडा ग्रामपंचायतीला विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला.

द्वितीय क्रमांक करवीर तालुक्‍यातील बेले ग्रामपंचायतीला देण्यात आला. यावेळी यशवंत सरपंच पुस्कारप्राप्त तालुका स्थरावरील प्रथम क्रमांकाचे सरपंच, आदर्श ग्रामसेवक यांचा गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती समिती सर्जेराव पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती समिती अंबरिषसिंह घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे, औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे पाटील इंद्रजित देशमुख आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
कायद्याचे बोला...शेतीमालाच्या भावात वारंवार चढ-उतार होत असल्यामुळे...
तूर, हरभरा खरेदीचे तीनतेरापुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८)  ...
गैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर...मुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात...
सरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे...पुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा...
विदर्भात पोचली ‘एचटी’ची पाकिटे?नागपूर : गेल्या हंगामात पुरवठा झालेल्या अनधिकृत ‘...
तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडीपुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र...
राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक...पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ...
सरकारी खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी...राज्यात गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर...
गोदाम नसल्यामुळे शेतीमाल खरेदीला ब्रेकराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या...
शासकीय खरेदीचे दुखणे अन् भावांतराची...राज्यात यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील...
उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना...नगर ः आधारभूत किमतीने तुरीची खरेदी करण्यासाठी...
शेतीमाल खरेदीतील भ्रष्टाचार रोखणे आवश्यकपुणे : सरकारने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी...
हमीभावाने शेतीमाल विकताना कशाचीच निश्‍...पुणे :  शेतीमालाचे दर कोसळल्यानंतर...
वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना...पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या...
शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे व्यापारी...पुणे ः शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात असताना हमीभावाने...
तत्काळ चुकाऱ्याची केवळ घोषणाचअकोला ः या हंगामात हमीभावाने सुरू असलेली खरेदी...
तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी...
अन्नदात्यासाठी राज्यभरात ‘अन्नत्याग’पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा...
कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी...पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी राज्यात...
परभणीतील एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांना... परभणी  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...