agriculture news in marathi, Don`t disturb In drought, government back | Agrowon

दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी : पालकमंत्री देशमुख
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी, चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व सामान्य जनतेने दुष्काळामुळे खचून जाऊ नये, अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रविवारी (ता. १७) दिली. 

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी, चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व सामान्य जनतेने दुष्काळामुळे खचून जाऊ नये, अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रविवारी (ता. १७) दिली. 

देशमुख यांनी मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे, शिदनकेरी, शिरनंदगी, हजापूर, भाळवणी, निबोणी, जिंन्ती, यड्राव, चिकलगी, खवे, बावची, सलगर, लवंगी, सलगर खुर्द,  हुलजंती, पौट, सौडी, येळगी, माळेवाडी  दुष्काळी गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी आमदार प्रशांत परिचारक, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ''गावांनी टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करावेत. त्यामध्ये गाव व वाड्यावस्त्यांना लागणारे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी याचा समावेश असावा. मागणी येताच २४ तासांत टँकर उपलब्ध करून दिला जाईल. पाणीपुरवठ्याची सोय नाही, अशा वाड्यावस्त्यांवर प्राधान्याने टँकर सुरू करावेत. या ठिकाणच्या सरपंच व ग्रामसेवकांनी टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करावा.'' 

पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासाठी संस्थांनी चारा छावणी सुरू करण्यासाठी अर्ज करावेत. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी देण्याबाबत पाठपुरावा  केला जाईल. शासनाने दुष्काळाची मदत जाहीर केली आहे. तिचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असेही पालकमंत्री देशमुख म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...