खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेर

खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेर
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेर

जळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची अत्यल्प क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची पेरणी बऱ्यापैकी आहे. परंतु ठरलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत मोठे क्षेत्र नापेर आहे. सुमारे ७९ टक्के क्षेत्र नापेर असल्याचे चित्र आहे. 

उत्पादक पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे रिकामे करीत आहेत. त्यात बाजरी, संकरित ज्वारीची होत आहे. एकूण सव्वाचार चार लाख हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित होती. परंतु ती फक्त एक लाख हेक्‍टरवर झाली. त्यात जळगाव, धुळे व नंदुरबारात दादर (रब्बी ज्वारी) व संकरित ज्वारीची सुमारे २५ हजार, तर हरभऱ्याची जवळपास ४९ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रात गहू, बाजरीला प्राधान्य आहे.

हरभऱ्याची कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी फारशी नाही. कारण शेतकऱ्यांनी ओलावा नसल्याने ती टाळली. बाजरीची पेरणी सुरूच आहे. ती जानेवारी महिन्यात आणखी वाढू शकते. तापी व गिरणा काठानजीकच्या क्षेत्रात मात्र रब्बीची पेरणी बऱ्यापैकी आहे. नदी, प्रकल्पाच्या पाण्याचा आधार नसलेल्या शेतकऱ्यांना अल्प पावसामुळे पेरणीच करता आली नाही.

जळगावमधील बोदवड, जामनेर, अमळनेर, पारोळा, चाळीसगावातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. धुळ्यातील शिंदखेडा, धुळे तालुक्‍यांना दुष्काळाचा अधिक फटका बसला. नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा पूर्व भागात रब्बीची पेरणी अल्प आहे. जळगाव जिल्ह्यात अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत केवळ २५ टक्के, धुळ्यात आणि नंदुरबारात प्रत्येकी १९ टक्के पेरणी झाली. मोठे क्षेत्र नापेर असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com