agriculture news in marathi, don`t View of 'Drought' by administration in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ` प्रशासनाकडून नजरेआड
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आता प्रशासनही दुष्काळाच्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक, जिल्ह्यात यंदा आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना प्रशासनाने मात्र दृष्काळसदृश्‍य यादीत आठ तालुके समाविष्ठ करून उर्वरित तीन तालुके वगळले आहेत. शासनाच्या निकषानुसार ‘ट्रीगर दोन''मध्ये येणाऱ्या गावात दुष्काळ जाहीर होणार आहे. त्यानुसार आता आठच तालुक्‍यांची नावे दुष्काळाच्या यादीत समाविष्ठ होणार आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आता प्रशासनही दुष्काळाच्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक, जिल्ह्यात यंदा आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना प्रशासनाने मात्र दृष्काळसदृश्‍य यादीत आठ तालुके समाविष्ठ करून उर्वरित तीन तालुके वगळले आहेत. शासनाच्या निकषानुसार ‘ट्रीगर दोन''मध्ये येणाऱ्या गावात दुष्काळ जाहीर होणार आहे. त्यानुसार आता आठच तालुक्‍यांची नावे दुष्काळाच्या यादीत समाविष्ठ होणार आहेत. बार्शी, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर हे तीन तालुके मात्र त्यातून गायब केले आहेत.

केंद्र शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी नव्याने काही नियम आणि निकष ठरवले आहेत. वनस्पती स्थिती निर्देशांक, क्रॉप कव्हर, जमिनीतील ओलावा या माध्यमातून दुष्काळाचे निकष निश्‍चित केले आहेत. बार्शी, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांत दुष्काळाची स्थिती सामान्य, अक्कलकोट, मोहोळमध्ये मध्यम, तर करमाळा, माढा, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस या सहा तालुक्‍यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे, अशा पद्धतीचे कागदी घोडे या संबंधीच्या अहवालात नाचवले आहेत. या आधारावर दुष्काळाच्या या स्थितीची यादी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने निश्‍चित केली आहे.

ट्रिगर दोन लागू झालेल्या तालुक्‍यातील १० गावे निवडून त्या गावांतील सत्यमापन मोबाईल ॲपच्या माध्यमातून आठ दिवसांत शासनाला देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार सगळे कामकजा सध्या सुरू आहे. वास्तविक, जिल्ह्यात सरसकट सारखीच परिस्थिती आहे. पण वास्तवातली परिस्थिती आणि कागदोपत्री अहवाल यात मात्र अंतर ठेवण्यात आले आहे. थेट शेतावरची परिस्थिती अधिकाऱ्यांनी लक्षात न घेता, पावसाच्या आकडेवारीवर, कार्यालयात बसूनच हा अहवाल तयार केल्याचे दिसून येते. पण त्याचा फटका या तीन तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना बसणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...