agriculture news in Marathi, double setback for farmers in agri equipment scheme, Maharashtra | Agrowon

कृषी अवजारे योजनांमध्ये शेतकऱ्यांना दुहेरी फटका
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017

सांगली ः बारा ते अठरा टक्के जीएसटी आणि अनुदान कपात यामुळे जिल्हा परिषद स्वीय निधीतील कृषी अवजारे योजनांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार आहे. कृषी अवजारांवरील जीएसटी कमी केल्यास तसेच अनुदानाची रक्कम पूर्ववत केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

जिल्हा परिषद स्वीय निधीतून शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते. सन २०१७-१८ साठी ४० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. तीन अश्‍वशक्ती व पाच अश्‍वशक्ती विद्युत पंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, चाफकटरसाठी अनुदान दिले जाणार आहे.

सांगली ः बारा ते अठरा टक्के जीएसटी आणि अनुदान कपात यामुळे जिल्हा परिषद स्वीय निधीतील कृषी अवजारे योजनांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार आहे. कृषी अवजारांवरील जीएसटी कमी केल्यास तसेच अनुदानाची रक्कम पूर्ववत केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

जिल्हा परिषद स्वीय निधीतून शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते. सन २०१७-१८ साठी ४० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. तीन अश्‍वशक्ती व पाच अश्‍वशक्ती विद्युत पंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, चाफकटरसाठी अनुदान दिले जाणार आहे.

कृषी अवजारांवर शून्य ते सहा टक्के व्हॅट होता. मात्र आता पाच ते अठरा टक्के जीएसटी लागू झाला आहे. सौर पंप, बॅटरी पंपना व्हॅट लागू नव्हता. आता त्यावर ५ टक्के जीएसटी लागू झाला आहे. चाफकटर, रोटाव्हेटर, डिझेल इंजिन यावर ६ टक्के व्हॅट होता, आता १२ टक्के जीएसटी लागू झाला आहे. तीन अश्‍वशक्ती, पाच अश्‍वशक्ती, साडेसात अश्‍वशक्ती तसेच दहा अश्‍वशक्ती विद्युत पंप, ताडपत्रीला ६ टक्के व्हॅट होता, आता १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. अवजाराच्या किमतीवर ५ ते १२ टक्के कर वाढला आहे. जीएसटीचा बोजा शेतकऱ्याच्या माथी बसणार आहे. 

कृषी अवजारांवरील योजनांमधील अनुदान आणि लाभार्थी शेतकरी हिस्सा पाहता अनुदानाची रक्कम ही अवजाराच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा निश्‍चित केलेली अनुदान रक्कम यातील जी कमी आहे ती रक्कम असते. जीएसटीमुळे कर वाढला. कराचा हा बोजा लाभार्थी शेतकऱ्याच्या माथी बसणार आहे. काही योजनांमध्ये जीएसटीचा बोजा लाभार्थी व शासन यांच्यावर निम्मा-निम्मा बसणार आहे. मात्र बहुसंख्य योजनांमध्ये जीएसटीमुळे वाढीव कराचा बोजा हा लाभार्थी शेतकऱ्याच्याच माथी बसणार आहे. 

जिल्हा परिषद स्वीय निधीतील कृषी अवजारांच्या योजनांमध्ये यावर्षी अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे जीएसटीच्या बोजाबरोबरच अनुदान कपातीचा बोजाही शेतकऱ्याच्या माथी बसला आहे. स्वीय निधीतील योजनांमध्ये अनुदानाची रक्कम पूर्ववत केल्यास तसेच कृषी अवजारांना जीएसटी माफ केल्यास अथवा सरसकट सर्व अवजारांना ५ टक्के जीएसटी आकारल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जीएसटी शेतकऱ्यांच्याच माथी
राज्य कृषीमार्फत कृषी अभियांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना, तृणधान्य विकास कार्यक्रम, कडधान्य विकास कार्यक्रम, गळीत धान्य विकास कार्यक्रम, मका विकास कार्यक्रम आदी योजनांमधून विविध कृषी अवजारे खरेदीसाठी शासन अनुदान आहे. रोटाव्हेटर, चाफकटर आदी अवजारांसाठी ३६ टक्के, ४२ टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान आहे. रोटाव्हेटरला ३५ हजार रुपये, चाफकटरला १० हजार रुपये शासन अनुदान आहे. अनुदानाची ही रक्कम कायमची आहे. परिणामी जीएसटीमुळे वाढलेली किंमत लाभार्थी शेतकऱ्याच्याच माथी बसणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...