पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील वर्षी होणार बदल: डाॅ. अरविंदकुमार

कृषी शिक्षण
कृषी शिक्षण

नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि बदलत्या वातावरणाचे धोके लक्षात घेता बदलाची गरज आहे. यापूर्वी पदवी अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. त्यानंतर येत्या वर्षभरात पदव्युत्तर अभ्यासक्रमात बदल करण्याचे प्रस्तावीत आहे, अशी माहिती अभ्यासक्रम संदर्भातील समितीचे अध्यक्ष, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) माजी उपमहासंचालक तसेच झांशी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाची कुलगुरू डॉ. अरविंद कुमार यांनी दिली.  देशात कृषीचा अभ्यासक्रम एकसारखा नाही. तो एकसंघ असावा; तसेच जागतीकस्तरावर कृषी संशोधनाला पूरक बाबींचा अंतर्भाव त्यात असावा त्यातून भारतीय शेतीला तंत्रज्ञानाच्या बाबतीत नवी दिशा मिळावी, अशी अपेक्षा भारतीय कृषी संशोधन परिषदेला होती. त्याकरिता गेल्यावर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आराखड्याकरिता सत्यशोधन समितीचे गठण करण्यात आले. डॉ. अरविंद कुमार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात बदलाच्या पार्श्‍वभूमीवर समितीने देशभरातील विद्यापीठांकडून देखील त्यांची मते मागीतली होती. त्याआधारे समितीने देशभरात एकसारखा अभ्यासक्रम असावा, अशी शिफारस केली आहे. या सर्व शिफारसींचा आधार घेत पदव्युत्तर अभ्यासक्रमात येत्या वर्षात बदल केला जाणार आहे.  कृषी शिक्षण देणाऱ्या प्राध्यापकांमध्ये तोच तो पणा वाढीस लागला आहे. त्यामुळे शिकविण्याची प्रकिया रटाळवाणी झाली आहे. याकडे लक्ष्य देत शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदलाला स्थान असले पाहिजे आणि ती देखील काळाची गरज आहे. जागतिकस्तरावर शिक्षण देण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत. त्या बदलाची दखल घेत भारतात शिकविण्याच्या कामात सुधारणा होणे अपेक्षित आहे, असेही डॉ. अरविंदकुमार यांनी सांगीतले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com