भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यभरात अभिवादन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथे जाऊन आदरांजली वाहिली.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथे जाऊन आदरांजली वाहिली.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. या वेळी शिक्षणमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या वतीने चैत्यभूमी येथे आदरांजली कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १४) आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनासही राज्यपालांनी भेट दिली. महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्मारक समितीचे अध्यक्ष महेंद्र साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विधान भवनातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास विधान परिषद सदस्या श्रीमती हुस्नबानू खलिफे व विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण, तर मंत्रालयात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सामाजिक न्याय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी मुख्य सचिव सुमीत मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com