शेतकरी, सहकार संपवण्याचा डाव ः डॉ. कांगो

शेतकरी, सहकार संपवण्याचा डाव ः डॉ. कांगो
शेतकरी, सहकार संपवण्याचा डाव ः डॉ. कांगो

नगर : कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांचे सहकारावर वर्चस्व आहे, असे समजून भाजपचे लोक सहकार कायमचा संपण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर सहकार आपण वाढवला, त्याचे आता खासगीकरण कसे होईल, याचा प्रयत्न कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक करत आहेत. या सर्व बाबींचा विचार केला तर सहकार, शेतकरी संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा राज्याला आणि देशाला मोठा धोका असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी सांगितले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तेवीसाव्या जिल्हा पक्ष परिषदेचे शनिवारी (ता. १०) नगरला डॉ. कांगो यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. ज्येष्ठ नेते बाबा अरगडे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ नेते मिलिंद रानडे, स्मिता पानसरे, महेबूब सय्यद, शातांराम वाळुंज, प्राचार्य शिवाजी देवडे, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, ॲड. सुभाष लांडे, ॲड. बन्सी सातपुते, कारभारी उगले, रामदास वागसकर, बहिरनाथ वाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  डॉ. कानगो म्हणाले, की पूर्वी बॅंका बुडाल्या तर सरकार मदत करायचे. आता सरकारला बॅंका बुडणार हे माहिती आहे. त्यामुळे बुडणाऱ्या बॅंका सुस्थितीत येत नाहीत तोपर्यंत ठेवीदारांनी पैसे मागायचे नाहीत, असा कायदा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपला सहकार संपूर्ण संपला पाहिजे असे वाटते; तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसला त्याचे खासगीकरण व्हावे असे वाटते. सहकारातून खाण्याबाबत दोघांचेही एकमत आहे. जाती-धर्माच्या नावाखाली देशभक्ती शिकवण्याचे काम सुरू आहे. मात्र ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून पळ काढला, त्यांना स्वतःला देशभक्त म्हणून घेण्याचा अधिकार नाही. देशात एक नेता, एक विचार पेरला जात आहे. हे देशासाठी घातक आहे.  या वेळी वैभव कदम, विकास गेरंगे, रावसाहेब करपे, अमोल पळसकर, जमनाबाई सोनवणे, विजय केदारी, दत्ता वडवणीकर, सुधार टोकेकर, संतोष खोडगे, बापुसाहेब राशीनकर, ज्योती सोनवणे, निर्मला खोडदे आदी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com