agriculture news in Marathi, Dr. The BJP's supporters in the trust vote with Vikase have been unwell | Agrowon

सुजय.विखे यांच्या भाजप प्रवेशाने दिलीप गांधी समर्थक अस्वस्थ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

नगर ः नगर जिल्ह्यामधील युवक नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी (ता. १२) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवाय त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या राज्य पार्लमेंट्री बोर्डाने पक्षाच्या केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डाकडे शिफारस केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे डॉ. सुजय हे भाजपचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाल्याने येथील विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांत मात्र अस्वस्थता पसरली आहे.

नगर ः नगर जिल्ह्यामधील युवक नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी (ता. १२) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवाय त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या राज्य पार्लमेंट्री बोर्डाने पक्षाच्या केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डाकडे शिफारस केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे डॉ. सुजय हे भाजपचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाल्याने येथील विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांत मात्र अस्वस्थता पसरली आहे.

विशेष म्हणजे सोमवारी (ता. ११) गांधी समर्थकांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करून डॉ. सुजय यांना उमेदवारी देण्याला विरोध केला होता.  नगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वाटपात राष्ट्रवादीकडे आहे. कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील हे येथून निवडणूक लढवणार हे कधीच स्पष्ट झाले.

त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून त्या दृष्टीने मतदारसंघात जनसंपर्क वाढवला. अनेक वेळा त्यांनी ‘‘आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणवार,’’ असे स्पष्ट केले होते. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने ती कॉंग्रेसला सोडावी, अशी मागणी केली जात होती. राष्ट्रवादीने जागा सोडण्याला नकार दिला, तरीही डॉ. सुजय ठाम होते. शेवटपर्यंत प्रयत्न करूनही यश आले नसल्याने अखेर मंगळवारी डॉ. सुजय यांनी भाजपत प्रवेश केला. डॉ. सुजय भाजपमध्ये आले तर उमेदवारी मिळणार नाही याची जाणीव असल्याने खासदार गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. सुजय यांना उमदेवारी देण्याला विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कार्यकत्यांनी घोषणाबाजीही केली. मंंगळवारी डॉ. सुजय यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. जिल्ह्यामधील भाजपचे आमदार, पदाधिकारी या वेळी हजर होते. 

उमेदवार अजूनही ठरेना 
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला जागा सुटली नाही. त्यामुळे डॉ. सुजय विखे भाजपचे उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. आता त्यांची लढत राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत होणार हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून सुरवातीला माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, त्यानंतर आमदार अरुण जगताप, माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांची नावे चर्चेत होती. गुरुवारी जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नगरचा उमेदवार ठरला नाही. आता आमदार संग्राम जगताप यांचेही नाव चर्चेत होते.

इतर बातम्या
पशुपालकांना संस्थांनी मदत करावी ः शरद...निमगाव केतकी, जि. पुणे   ः सध्याच्या...
परभणी : धरणांच्या जलाशयातील उणे...परभणी ः वाढते तापमान, बेसुमार उपसा, वेगाच्या...
नाशिक : पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या...अंबासन, जि. नाशिक : बागलाण परिसरातील गावागावांत...
देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटकावाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा...
वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षाअकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी...
कीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा...नांदेड ः निरोगी मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी...
केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या...मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत...
कॉँग्रेस नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने...नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते...
सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करू ः...शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण...
रत्नागिरी, कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम...पुणे  : ग्राहकांची विशेष पसंती असलेल्या...
नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे...नगर ः उसासोबत ज्वारीचे आगार म्हणून ओळख असलेल्या...
विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत १...अमरावती : विमा कंपन्यांच्या हेकेखोरपणापुढे...
यवतमाळ बाजार समितीत हळद खरेदीस प्रारंभयवतमाळ  ः जिल्ह्यात हळदीखालील क्षेत्रात वाढ...
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
शेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी...बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
दुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलंकोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं...