agriculture news in Marathi, Dr. gangwar says work of operation green top scheme is on last stage, Maharashtra | Agrowon

आॅपरेशन ग्रीन टाॅप योजनेचे काम अंतिम टप्प्यात : डाॅ. गंगवार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे ः देशात टोमॅटो, कांदा आणि बटाटा या पिकांचे भाव कमी अधिक झाल्यास शेतकऱ्यांसह नागरिकांनाही त्याचा फटका बसतो. यात सुसुत्रता आणून उत्पादक व ग्राहक या दोघांनाही फायदा होण्यासाठी आॅपरेशन ग्रीन टॉप या नावाची योजना तयार करण्याचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. त्यात शेतकऱ्यांचे अभिप्राय घेऊन टोमॅटो, कांदा आणि बटाटा या पिकांसाठी स्वतंत्र आॅपरेशन ग्रीन टाॅप ( टोमॅटो, कांदा, बटाटा) ही योजना सुरू करणार असल्याची माहिती केंद्राचे अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डाॅ. डी. एस. गंगवार यांनी दिली.  

पुणे ः देशात टोमॅटो, कांदा आणि बटाटा या पिकांचे भाव कमी अधिक झाल्यास शेतकऱ्यांसह नागरिकांनाही त्याचा फटका बसतो. यात सुसुत्रता आणून उत्पादक व ग्राहक या दोघांनाही फायदा होण्यासाठी आॅपरेशन ग्रीन टॉप या नावाची योजना तयार करण्याचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. त्यात शेतकऱ्यांचे अभिप्राय घेऊन टोमॅटो, कांदा आणि बटाटा या पिकांसाठी स्वतंत्र आॅपरेशन ग्रीन टाॅप ( टोमॅटो, कांदा, बटाटा) ही योजना सुरू करणार असल्याची माहिती केंद्राचे अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डाॅ. डी. एस. गंगवार यांनी दिली.  

केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून टोमॅटो, कांदा आणि बटाटा या पिकांचा समावेश करून आॅपरेशन ग्रीन टाॅप या नावाच्या योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी, उत्पादक गट, कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय संशोधन केंद्र, भाजीपाला, निर्यातदार, राष्ट्रीय बागवानी संस्था, संचालक कृषी प्रक्रिया या विभागाच्या प्रतिनिधींची बैठक पुण्यातील साखर संकुल येथील आत्मा सभागृह येथे बुधवारी (ता. २८) घेण्यात आली.

या वेळी कृषी विभागाचे कृषी प्रक्रिया विभागाचे संचालक विजय घावटे, फलोत्पादन संचालक प्रल्हाद पोकळे, विस्तार विभागाचे सहसंचालक अनिल बनसोडे, सहसंचालक शिरीष जमदाडे, महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पाचे संचालक जीवन बुंदे, बारामती केव्हीचे डाॅ. सय्यद शाकीर अली, सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनीचे श्री. हर्षल कुलकर्णी, प्रक्रिया विभागाचे कृषी उपसंचालक गंगाधर मुसमाडे, तंत्र अधिकारी गोंविद हांडे आदि उपस्थित होते.  

डॉ. गंगवार म्हणाले, आॅपरेशन ग्रीन टॉप या योजनेची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून केली जाणार आहे. या योजनेत टोमॅटो, कांदा आणि बटाटा या पिकांचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान संपदेअंतर्गत लागवड ते विक्रीपर्यंतची साखळीची निर्मिती योजनेअंतर्गत ५०० कोटी रुपये तरतूद केली आहे. ही योजना येत्या महिनाअखेरपर्यंत अंतिम करणार आहे. देशातील शेतकऱ्यांचे व त्याविषयातील तज्‍ज्ञ, संस्था यांच्याशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ही योजना तयार केली जाणार आहे. 

काय आहे आॅपरेशन ग्रीन टॉप योजना 
या योजनेत भांडवल, गुणवत्तेचे उत्पादन, मालाची साठवणूक, वाहतूक, पँटकिग, प्रमाणीकरण, ब्रँण्ड, बाजारपेठांचा अभ्यास, हमी भाव इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश करून त्याकरिता लागणारे अर्थसाह्य शेतकरी उत्पादक गटांना दिले जाईल. त्यासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी या तीन पिकांचे गट स्थापन करून त्याचा लाभ घ्यावा, असे डॉ. गंगवार यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...