agriculture news in Marathi, Dr. Harsh Bhanwala says NABARD support MSP , Maharashtra | Agrowon

हमीभाववाढीला नाबार्डचा पाठिंबा ः डॉ. हर्ष भानवाला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई : ग्रामीण भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) आगामी वर्षात या क्षेत्राच्या दीर्घकालीन पुनर्वित्तपुरवठ्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच ग्राहक आणि शेतकरीहिताच्या दृष्टीने केलेल्या हमीभाववाढीला नाबार्डचा पाठिंबा असल्याचे सांगतानाच जिल्हा बँकांच्या जुन्या नोटांचा विषयही लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती नाबार्डचे अध्यक्ष डॉ. हर्ष भानवाला यांनी बुधवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली. 

मुंबई : ग्रामीण भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) आगामी वर्षात या क्षेत्राच्या दीर्घकालीन पुनर्वित्तपुरवठ्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच ग्राहक आणि शेतकरीहिताच्या दृष्टीने केलेल्या हमीभाववाढीला नाबार्डचा पाठिंबा असल्याचे सांगतानाच जिल्हा बँकांच्या जुन्या नोटांचा विषयही लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती नाबार्डचे अध्यक्ष डॉ. हर्ष भानवाला यांनी बुधवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली. 

नाबार्डच्या आर्थिक स्थितीबाबत सांगताना डॉ. भानवाला म्हणाले, की नाबार्ड ही शून्य टक्के एनपीए असलेली वित्तसंस्था आहे. नाबार्डच्या ताळेबंदात गेल्या वर्षात १७ टक्क्यांची भरीव वाढ झाली असून, ताळेबंदाने ४ लाख कोटींवर झेप घेतली आहे. नाबार्डने कर्जपुरवठ्यातही १५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 

गेल्या आर्थिक वर्षात २८ फेब्रुवारीपर्यंत नाबार्डने कृषी क्षेत्रासाठी तब्बल १० लाख ४६ हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षीचे उद्दिष्ट १० लाख कोटी रुपयांचे असताना त्याहूनही अधिकचा वित्तपुरवठा कृषी क्षेत्राला केल्याचे त्यांनी सांगितले. 

सध्या दीडपट हमीभावावरून जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेल्या मुद्द्यावर डॉ. भानवाला यांनी ग्राहक आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने केलेल्या हमीभाववाढीला नाबार्डचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. ग्रामीण भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नाबार्डने आगामी वर्षात या क्षेत्राच्या दीर्घकालीन पुनर्वित्तपुरवठ्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चालू वर्षी ऐंशी हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध केली जाणार आहे. गेल्या वर्षी नाबार्डमार्फत ६५ हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला होता, अशी माहितीही डॉ. भानवाला यांनी या वेळी दिली.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...