agriculture news in Marathi, Dr. kausadikar says balance use of nutrients for immunity of trees, Maharashtra | Agrowon

पिकांच्या प्रतिकारक्षमतेसाठी अन्नद्रव्यांचा संतुलित वापर हवा : डॉ. कौसडीकर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जानेवारी 2018

डाळींब संघ अधीवेशन
पुणे ः पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या मार्गाने होतो. मुख्यतः अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास वनस्पतीमध्ये रोगाच्या शिरकावासाठी अनुकूल स्थिती तयार होते. परंतु पिकाची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी अन्नद्रव्यांचा संतुलित वापर आवश्‍यक आहे, असे मत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी शनिवारी (ता. ६) येथे व्यक्त केले. 

डाळींब संघ अधीवेशन
पुणे ः पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या मार्गाने होतो. मुख्यतः अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास वनस्पतीमध्ये रोगाच्या शिरकावासाठी अनुकूल स्थिती तयार होते. परंतु पिकाची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी अन्नद्रव्यांचा संतुलित वापर आवश्‍यक आहे, असे मत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी शनिवारी (ता. ६) येथे व्यक्त केले. 

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाच्या वतीने आयोजित डाळिंब अधिवेशनात ‘रोगप्रतिकारक क्षमतेसाठी अन्नद्रव्यांचा वापर’ या विषयावर डॉ. कौसडीकर बोलत होते.

डॉ. कौसडीकर म्हणाले, की सामान्यपणे पिकामध्ये अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाण असताना कीड व रोगांना अधिक प्रतिकारक क्षमता तयार होते. काही विशिष्ट अमिनो आम्ले पिकांमध्ये जैविक व अजैविक ताण सहन करण्याची शक्ती निर्माण करतात, ज्या ताणांमुळे पिकांमध्ये रोग उत्पन्न होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव न होता रोगास प्रतिबंध होतो. (उदा. प्रोलिन-ज्वारी) संतुलित प्रमाणात पीक पोषण केल्याने पिकात दोन पद्धतीने रोगप्रतिकारक क्षमता वाढवता येते. पहिल्या प्रकारात पिकातील पेशीभित्तींचा विकास करून त्याचीं जाडी वाढवणे, यामुळे अपायकारक घटकांचा शिरकाव रोखता येईल. तर दुसऱ्या प्रकारात पिकात रोगास अटकाव करणाऱ्या विविध नैसैर्गिक पदार्थांची निर्मिती करणे, हे प्रयोग करता येतील. 

‘‘पेशीभित्तिका पातळ किंवा बारीक असल्यास पेशींमधून अन्नद्रव्ये काही प्रमाणात दोन पेशींमधील भागात येतात, त्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी मदत होते, मात्र अन्नद्रव्य योग्य प्रमाणात असल्यास पेशींमधून अन्नद्रव्ये बाहेर येणे व बुरशीसाठी योग्य वातावरण तयार होऊ शकत नाहीत,’’ या सगळ्याच्या मुळाशी अन्नद्रव्याचा संतुलित वापर हे आहे, असेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी अन्नद्रव्याच्या वापरासह जमिनीतील विविध घटकांची माहिती दिली. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...