देशातील लोकशाही धोक्यात : डाॅ. मनमोहनसिंग

डाॅ. मनमोहनसिंग
डाॅ. मनमोहनसिंग

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार हे सतत संविधानिक संस्थांना धक्के देत आहेत. त्यामुळे देशातील लोकशाहीचा ढाचा खिळखाळा होत असून, सध्या लोकशाहीच धोक्यात आली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली.    दिल्लीत रविवारी (ता. २९) काँग्रेसकडून जनआक्रोश रॅली घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सोनिया गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातील नेते उपस्थित होते.  मोदी सरकारवर टीका करताना डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, की समाजातील सर्व घटकांची आता मोदी सरकारवर नाराजी आहे. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात देशाचे चौकीदार एक शब्दही बोलत नाहीत. आता जनता त्यांच्या भाषणात पारदर्शकता शोधत आहे. सध्या मोदी सरकारचा कारभार हा लोकशाहीला घातक आहे. आताच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनात जनतेने जे पाहिले ते कधीच घडले नाही. मागील चार वर्षांत देशातील जनतेत असंतोष आणि असुरक्षितता वाढीस लागली आहे.  या वेळी राहुल गांधी म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इतिहासात प्रथमच जनतेकडे गेले. रॅफेल करार, अमित शहा यांच्या मुलांच्या कंपनीतील भ्रष्टाचार, ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्या कंपनीतील भ्रष्टाचार प्रकरणी मोदी एक शब्दही बोलत नाहीत. दुसरीकडे नीरव मोदी बँकांना लुटून परदेशात निघून जातो आणि आपले चौकीदार अजूनपर्यंत याविषयी काही बोलत नाहीत. देशातील जनतेचा पैसा लुटून नीरव मोदी परदेशात निघून गेला. मोदी फ्रान्समध्ये जाऊन रॅफेल कराराच्या किमतींमध्ये बदल करतात आणि याची माहिती संरक्षणमंत्र्यांनाही नाही. उद्योगपतींचे अडीच लाख कोटींचे कर्ज मोदी सरकारने माफ केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे एक रुपये कर्ज माफ केले नाही. ‘‘डोकलामचा प्रश्न असताना पंतप्रधान चीनच्या अध्यक्षांसोबत एक शब्दही बोलत नाही. कोणताही अजेंडा न घेता ते चीनच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी गेले. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने असे केलेले नाही. काँग्रेसने ७० वर्षांत काही केले नाही, असे मोदी म्हणतात. मग, भाजपने ६० महिन्यांत बेरोजगारी, भाजप नेत्यांकडून महिलांवर अत्याचार, गब्बरसिंग टॅक्स देशाला दिला. देश हा इमारतीसारखा असतो. पण, इमारत उभी करण्यासाठी पाण्याची गरज असते, काँग्रेस ही पाण्यासारखी आहे. काँग्रेस फक्त प्रेम पसरविण्याचे काम करते. भाजप आणि आरएसएससारखे द्वेष पसरविण्याचे काम करत नाही,’’ अशी टीकाही श्री. गांधी यांनी केली.  ‘‘२०१४ मध्ये मोदींनी आमच्या सरकारविरोधात खोटे पसरविले. आता सर्व सत्य जनतेसमोर येत आहे. त्यामुळे आता कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच विजय होणार, हे नक्की. २०१९ मध्ये काँग्रेसचाच विजय निश्चित आहे. काँग्रेस कार्यकर्ते हे सत्याच्या मार्गावरून कधीच हटणार नाही. या पक्षात युवक, ज्येष्ठांचा आदर केला जाईल. आपल्या पक्षात वेगवेगळे विचाराचे लोक असले, तरी आपल्याला एक होऊन आरएसएसच्या विचारधारेविरोधात लढायचे आहे,’’ असे कार्यकर्त्यांना बळ देताना राहुल गांधींनी म्हटले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com