Agriculture News in Marathi, dr. panjabrao deshmukh krishi vidyapeeth will provide dalmil technology, Akola | Agrowon

‘पंदेकृवि’च्या डाळमिलचे तंत्रज्ञान उत्तर भारतात पोचणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ओळख बनलेली डाळमिल आता राष्ट्रीय स्तरावर पोचली आहे. या डाळगिरणीच्या निर्मितीसाठी हरियानातील एका खासगी कंपनीसोबत शनिवारी (ता. १८) विद्यापीठाचा सामंजस्य करार झाला.
 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विविध शेतीउपयोगी अवजारे, उपकरणे, यंत्र तयार केले. त्यामध्ये डाळमिल ही सर्वाधिक लोकोपयोगी बनली आहे. विद्यापीठाला यंत्रनिर्मितीसाठी मर्यादा असल्याने विविध खासगी कंपन्यांसोबत करार करून यंत्रे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातात.
 
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ओळख बनलेली डाळमिल आता राष्ट्रीय स्तरावर पोचली आहे. या डाळगिरणीच्या निर्मितीसाठी हरियानातील एका खासगी कंपनीसोबत शनिवारी (ता. १८) विद्यापीठाचा सामंजस्य करार झाला.
 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विविध शेतीउपयोगी अवजारे, उपकरणे, यंत्र तयार केले. त्यामध्ये डाळमिल ही सर्वाधिक लोकोपयोगी बनली आहे. विद्यापीठाला यंत्रनिर्मितीसाठी मर्यादा असल्याने विविध खासगी कंपन्यांसोबत करार करून यंत्रे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातात.
 
आता डाळमिलसुद्धा उत्तर भारतात उपलब्ध होणार आहे. 
विद्यापीठाने यंत्रनिर्मितीसाठी अंबाला कॅन्ट (हरियाना) येथील इंडोसा इंडस्ट्रिअल प्रोडक्‍टस प्रा. लि.सोबत मिनी डाळमिल निर्मितीसाठी करार केला.
 
या वेळी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. एम. बी. नागदेवे, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, विद्या पवार, संशोध अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्‍टर अजय सागर, चिफ जनरल मॅनेजर डॉ. विनोद काळबांडे आदी उपस्थित होते. 
 
या वेळी श्री. खर्चे यांनी सामंजस्य कराराच्या माध्यमातून शास्त्रज्ञांचे संशोधन सर्वांना दिसत असून, खासगी निर्मात्यांसोबत करार होत असल्याने गरजेनुसार नवनवीन यंत्रे व उपकरणे तयार करण्यासाठी मदत मिळत आहे.
 
डॉ. कडू यांनी या करारामुळे विद्यापीठामध्ये गरजेनुसार बहुउपयोगी यंत्र निर्माण होत असल्याने खासगी निर्मात्यांची जास्त ओढ आहे. या वेळी डॉ. काळबांडे, अजय सागर, डॉ. बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रा. राजेश मुरुमकार, प्रा. वासुदेव मते, महेंद्र राजपूत, जनार्दन निंबाळकर, नीलेश राठोड, अविनाश देशमुख यांनी पुढाकार घेतला.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लाडिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल ३३०० ते ४४००...सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांबाबत बोलत नाहीत...अहमदाबाद, गुजरात  ः गुजरातमधील विधानसभा...
भारतात भुईमूग उत्पादन सात दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः पीक क्षेत्रात झालेली वाढ अाणि...
नोकरीसाठीच नव्हे, तर शेतीसाठी कृषी...बुलडाणा : सध्या प्रत्येकाला नोकरी हवी आहे....
कपाशीचे पीक बोंडअळीच्या घशातकिनगाव ः कापूस राज्यातील दुसरे महत्त्वाचे...
डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष... राहुरी, जि. नगर : डॉ. तनपुरे सहकारी साखर...
शरद पवारांकडून ३२ वर्षांनंतर मोर्चाचे...नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज...
विधान भवनावर विरोधकांचा आज हल्लाबोल...नागपूर : शेतकरी कर्जमाफी, बोंड अळीमुळे कपाशीचे...
पुणे जिल्ह्यातील धरणांत १४३ टीएमसी...पुणे : यंदा पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात...
हरभरा क्षेत्रात ९७ हजार हेक्टरने वाढ परभणी : खरिपातील सोयाबीन, कापूस या प्रमुख नगदी...
शेतकरी आत्महत्येला जबाबदार मंत्र्यांवर...मानोरा, जि. वाशीम ः सोयजना येथील शेतकरी...
नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अंतिम...नाशिक : दसऱ्यापासून सुरू झालेला नाशिक भागातील...
नागपुरात सोयाबीन २८५० ते २९५० रुपयेनागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍...
कोल्हापुरात गवार, मटार तेजीतकोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
धुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन दीड...धुळे ः गुलाबी बोंडअळीचा उद्रेक, सिंचनासाठी...
अमरावतीत बोंडअळीमुळे कपाशीत ५१...अमरावती ः या वर्षीच्या हंगामात जिल्ह्यात एक लाख ३...
खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक...नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे...
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...