agriculture news in Marathi, Dr. Rajaram Deshmukh says villagewise programme need for soil fertility, Maharashtra | Agrowon

जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा : डॉ. राजाराम देशमुख
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जानेवारी 2018

देशात हरितक्रांती अत्यावश्यक होती. मात्र, त्यात सुधारित वाण, पाणी आणि रासायनिक खते-कीटकनाशकांचा वापर वाढला. तेथूनच जमिनीचे आरोग्य बिघडण्यास सुरवात झाली. आता जमिनीला निरोगी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागातून गावनिहाय कार्यक्रम राबवावे लागणार आहेत.

देशात हरितक्रांती अत्यावश्यक होती. मात्र, त्यात सुधारित वाण, पाणी आणि रासायनिक खते-कीटकनाशकांचा वापर वाढला. तेथूनच जमिनीचे आरोग्य बिघडण्यास सुरवात झाली. आता जमिनीला निरोगी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागातून गावनिहाय कार्यक्रम राबवावे लागणार आहेत.

जमिनीची धूप थांबविण्यासाठी मृद्‍संधारणाची कामे करणे, पीक पद्धतीत बदल, हिरवळीची खते किंवा आंतरपिकांचा वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर, जिवाणू खतांच्या वापरात वाढ, असे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कामे करावी लागतील. राज्यात कृषी शिक्षण देताना देखील विद्यापीठे पहिल्या टप्प्यात आपले मेळावे, माहिती पुस्तिकांमधून जमिनीमध्ये कुजलेले शेणखत टाकण्याचा सल्ला देत होती, त्यामुळे सेंद्रिय कर्ब टिकून होता. काही दशकांपूर्वीचा विचार केल्यास मर्यादित सिंचन आणि पिकांची घनता देखील कमी होती. जादा उत्पादकता हा मुद्दा नव्हता.

हरितक्रांतीनंतरच जमिनीच्या आरोग्य व्यवस्थेत मोठे बदल झाले. गहू आणि भातासाठी उत्तर भारतात सुधारित वाण, भरपूर पाणी आणि खते- कीटकनाशकांचा वापर वाढला. तेथूनच जमिनीचे आरोग्य बिघडण्यास सुरवात झाली. हरितक्रांती ही अत्यावश्यक देखील होती. यामुळे उत्तर भारतात उत्पादकता वाढली. काही राज्यांमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला आणि पाणी देखील होते. महाराष्ट्रात पाण्याची समस्या होती. सिंचनाची सुविधा असलेल्या गावांनी मात्र थेट उसाकडे मोर्चा वळविला. पाण्याचा अतिरेकी वापर व त्याला जोड रासायनिक खतांची मिळाली. जनावरांची संख्याही कमी झाली. त्यामुळे शेतजमिनीत कुजलेले खत देखील कमी जाऊ लागले. त्यातून जिवाणूंचा नाश होत गेला व जमिनीची सुपीकता ढासळली.

केंद्र व राज्य शासनाला आता जमिनींमधील जिवाणूवृद्धी तसेच सेंद्रियकर्ब वाढीसाठी विविध तंत्र किंवा योजना शेतकऱ्यांच्या दारात न्याव्या लागतील. जमिनीत जिवाणूंची संख्या कमी असल्यास आपण कोणतीही खते, कितीही वापरली तरी पिकांची उत्पादकता वाढणार नाही. उलट खते वाया जातील. जमिनीची पाणी धारण क्षमताच कमी झालेली असेल, तर कितीही पाणी दिले तरी मातीत पाणी थांबणार नाही, त्यामुळे सरकारने आता सिंचनाला दुय्यम आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीच्या आरोग्य संवर्धनाला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.

- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...