agriculture news in Marathi, Dr. santosh kulkarni says biological control will be effective on pomegranate pest attack, Maharashtra | Agrowon

डाळिंबातील कीड-रोगावर जैविक नियंत्रण ठरेल प्रभावी ः डॉ. संतोष कुलकर्णी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पुणे ः डाळिंबातील कीड-रोगाला प्रतिबंध करण्यासाठी सरसकट कीडनाशक वा बुरशीनाशकांचा वापर करण्याऐवजी जैविक पद्धतीने त्याचे नियंत्रण करणे सोपे आणि फायदेशीर ठरू शकते, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष कुलकर्णी यांनी रविवारी (ता. ७) येथे सांगितले. 

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या वतीने आयोजित डाळिंब परिसंवादात ‘डाळिंबातील कीड व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे होते. 

पुणे ः डाळिंबातील कीड-रोगाला प्रतिबंध करण्यासाठी सरसकट कीडनाशक वा बुरशीनाशकांचा वापर करण्याऐवजी जैविक पद्धतीने त्याचे नियंत्रण करणे सोपे आणि फायदेशीर ठरू शकते, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष कुलकर्णी यांनी रविवारी (ता. ७) येथे सांगितले. 

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या वतीने आयोजित डाळिंब परिसंवादात ‘डाळिंबातील कीड व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे होते. 

डॉ. कुलकर्णी म्हणाले, की डाळिंबामध्ये कीड-रोगाच्या अनेक समस्या आहेत. या सगळ्या समस्या झाडाच्या मुळापासून ते झाडाच्या शेवटच्या टोकापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आपला प्रभाव दाखवू शकतात. त्यात सर्वांत महत्त्वाचा रोग म्हणजे सूत्रकृमी हा आहे, त्याशिवाय फुलकिडे, पांढरी माशी, लालकोळी यांसारख्या रोगाचा समावेश होतो. त्यांना कीडनाशके, बुरशीनाशकांचा वापर करा, पण सरसकट तो करण्याऐवजी ट्रायकोडर्मा, सुडोमोनस यांसारख्या जैविक औषधांचाही वापर वाढवावा, दर दोन महिन्यांनी त्याचा वापर झाडांसाठी करावाच, त्यातही मुळात झाडाची क्रयशक्ती वाढण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवणे आवश्‍यक आहे. जेवढे झाड सशक्त आणि प्रतिकारक्षम तेवढा रोगास अटकाव होऊ शकतो. त्यात वरून जैविक पद्धतीने फवारण्या घेऊन रोगावर नियंत्रण मिळवल्यास कमी खर्चातील कीड-रोग व्यवस्थापन होईल.

फवारण्या घ्यायच्या असतील, तर सकाळी लवकर फवारण्या करा, ऊन पडले की फुलकिडे दिसत नाहीत, फुलकिडे जमिनीमध्येही दिसून येतात. त्यासाठी ड्रेन्चिंग करणेही आवश्‍यक आहे.

या वेळी कीड-रोगाच्या प्रतिबंधासाठी त्यांनी छोटी-छोटी तंत्रे सांगितली. त्यात पांढरी माशी नियंत्रणासाठी बागेत पिवळे चिकट कार्ड लावा, फुलकिड्यांसाठी निळे कार्ड लावा, अशा काही सूचनाही केल्या.

इतर बातम्या
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय...कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो....
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
साताऱ्यात मेथी, कोथिंबिरीला प्रतिशेकडा...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी...सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईवर मात...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
मराठवाड्यातील लघू, मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : दुष्काळाच्या उंबरठ्यावरील...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
शास्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योग समजून...औरंगाबाद : शाश्वत उत्पादन व उत्पन्नासाठी नव्याने...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...