डाॅ. तापकीर यांची गवाणेच्या काजू प्रक्रिया संस्थेला भेट

डाॅ. तापकीर यांची गवाणेच्या काजू प्रक्रिया संस्थेला भेट
डाॅ. तापकीर यांची गवाणेच्या काजू प्रक्रिया संस्थेला भेट

लांजा, जि. रत्नागिरी ः सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ. मुकूंदराव तापकिर यांनी गवाणे येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेच्या काजू प्रक्रिया प्रकल्पाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष जयवंत विचारे यांच्या हस्ते डाॅ. तापकीर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डाॅ. तापकीर हे पुणे विद्यापीठाच्या विठ्ठलराव विखे पाटील अध्यासनाचे प्रमुख तसेच छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे सदस्य आहेत.

या वेळी कामगारांना मार्गदर्शन करताना तापकीर म्हणाले, की सहकार क्षेत्रातील उद्योगांमध्ये महिलांचे योगदान मोठे अाहे. महिला खूप चांगले काम करतात. त्यांना कामाविषयी अास्था अाणि चिकाटी असते. भविष्यात उद्योग व्यवसायाला मोठी संधी अाहे. उद्योग उभे राहिल्यास अनेकांना काम मिळते. सध्याच्या परिस्थितीत सहकारी संस्था चालविणे हे एक आव्हानात्मक काम अाहे. कामगारांनी स्वतःचे प्रगतिपुस्तक तयार करावे. श्रमाचे मूल्यमापन करावे. याचा परिणाम अापल्या उद्योग वाढीवर होत असतो. तुमच्या श्रमाशिवाय काहीच होणार नाही.

यावेळी संस्थेचे सल्लागार विश्वास सूर्वे, व्यवस्थापिका सानिका जेधे, अमृता कांबळे, करुणा साळवी, ऋतुजा सूर्वे, प्रवीण कांबळे, संतोष बेर्डे, यांच्यासह कामगार उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव निलेश पवार यांनी अाभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com