डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ पाटील यांचे निधन

डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ पाटील यांचे निधन
डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ पाटील यांचे निधन
   राहुरी, जि. नगर : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व तालुका विकास मंडळाचे सर्वेसर्वा रामदास विश्वनाथ धुमाळ पाटील वय८१ यांचे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शकुतंलाबाई, तीन मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे, पतवंडे, जावई असा परिवार आहे.पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर, विलास व अजित धुमाळ यांचे ते वडील होत.     जवळपास सहा दशके राहुरी तालुक्यातील राजकीय संघर्षात केद्रस्थानी राहिलेले रामदास पाटील धुमाळ यांनी अखेरचा श्वास आज घेतला. अगदी अलीकडे राहुरी पालिकेच्या नगरपालिका निवडणूकीत विजयी गटाचा समारंभ हा त्यांच्या जीवनातील अखेरचा जाहीर कार्यक्रम होता. मुसळवाडी तालुका राहुरी हे नानांचे जन्मगाव. मॅट्रीक पर्यंतचे त्यांचे शिक्षण राहुरीतील विद्या मंदिर प्रशालेत झाले. मुसळवाडी सेवा सहकारी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.   प्रस्थापितांच्या विरोधात मतदार जागृती मंडळ स्थापन करुन तनपुरे विरोधकांची मोट बाधून त्यांनी कारखान्यात सत्तांतर घडविण्यात महत्वाची भुमिका बजावली. सर्वात प्रथम १९७२ ला  ते कारखान्यातचे प्रथम उपाध्यक्ष झाले. नंतर १९९३-९७ व नंतर २००५ ते १० या काळात ते कारखान्याचे अध्यक्ष होते. जिल्हा एस कॉग्रेसची संघटना बांधणीच्या कामात ते तत्कालीन समाजवादी कॉंग्रेसचे नेते शरद   पवार यांचे समवेत होते.   राहुरी तालुका सुपरवायझिंग फेडरेशनचे ते संस्थापक होते. मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेचे ते अध्यक्ष होते. राहुरी तालुक्यातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे तसेच विवेकांनद नर्सिग होमचे ते अध्यक्ष   होते. जिल्हा सहकारी बॅकेवत ते पाच वर्षे संचालक होते. प्रथम मतदार जागृती मंडळ, नंतर राहुरी तालुका विकास मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. विकास मंडळाचे ते विद्यमान अध्यक्षही होते. ज्ञानेश्र्वर सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. नगर जिल्हा को ऑपरेटिव्ह सोसायटीत ते काही वर्षे अध्यक्ष होते. राहुरी तालुका   विधानसभेच्या निवडणुका त्यांनी चार वेळेस लढविल्या.पहिली एस कॉग्रेसतर्फे,दुसरी भारतीय जनता पक्षाद्वारे, तिसरी अपक्ष व चौथी निवडणूक त्यांनी कॉग्रेसच्या तिकीटावर लढविली. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी जनावरासाठी छावणी सुरु केली होती. त्यांच्याच पुढाकाराने राहुरीत तीन वर्षी संत नारायणगिरी महाराजांचे सप्ताहाचे आयोजन केलेले होते.  राहुरी तालुक्यातील अनेक महत्वांच्या संघर्षात त्यांची भुमिका महत्वाची राहिली. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खासगी करणाचा विरोधातल त्यांनी मोठा लढा दिला होता. कारखान्याच्या यंत्रसामुग्रीचे आधुनिकीकऱम, डिस्टीलरी प्रकल्पाचे विस्तारीकऱण,  राहुरीत कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाची अद्ययावत इमारत त्यांचे काळातच ऊभारली गेली. आयुर्वेद महाविद्यालयाच्या एम.डीच्या जागात वाढ  त्यांच्याच काळात झाली. २१०५ रुपये प्रतिटन ऊसाला त्यांचे काळात दिलेला भाव सर्वाधिक व वादाचा विषय ठरलेला होता. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विनाअनुदान तत्वावर ब्राहणी, मांजरी व टाकळिमिया येथे एकाच दिवशी तीन कनिष्ट महाविद्यालये त्य़ांच्याच काळात सुरु झाली.   कारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. त्यावेळी डिल्टीलरी प्रकल्पाच्या आधारावर त्यांनी कारखान्याचे गळीत हंगाम यशस्वी करुन दाखविले. त्य़ाच स्थितीत त्यांनी राहुरीत श्री छत्रपती शिवाजी इंजिनिअरींग कॉलेज सुरु केले. महिला वसत्तीगृहाची ऊभाऱणी केली.   कारखाना कार्यक्षेत्राचा विस्तार त्यांच्याच कार्यकाळात झाला.   राहुरी नगरपालिका व राहुरी पीपल्स बॅकेचे नेतृत्व त्यांच्याकडेच बरीच वर्षे होते. मुळाप्रवरा वीज सहकारी संस्थेच्या माध्यमातून चार वीज उपकेद्रांची ऊभारणी चे निर्णय महत्वाचे होते. कारखान्याच्या माध्यमातून विकास बंधारेची मालिका त्यांनी उभारली होती. तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधातील संघर्षात ते बरीच वर्षे अग्रभागी   होते.   ऊसाच्या झोन विरोधातील संघर्ष व ऊसाच्या भावासाठीच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.राहुरीतील पहिली देशपातळीवरील ऊस परिषद त्यांनी य़शस्वी केली. त्यांना शेतकरी संधर्षात विसापूरचा कारावास ही झाला होता. राष्ट्रीय सन्मान अॅवार्ड पुरस्काराने त्यांना सन्मानित   केले होते. राहुरी तालुक्यातील उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडविला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com