agriculture news in marathi, Dr. vekhe patil award Distribution at Parvaranagar | Agrowon

डॉ. विखे पाटील पुरस्काराचे प्रवरानगर येथे वितरण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या विखे साहित्य व कला गौरव पुरस्काराचे शनिवारी (ता. २५) प्रवरानगर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वितरण झाले. या वेळी ‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रांतील दहा मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

नगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या विखे साहित्य व कला गौरव पुरस्काराचे शनिवारी (ता. २५) प्रवरानगर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वितरण झाले. या वेळी ‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रांतील दहा मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, राजेंद्र विखे, विखे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक औदुंबर तांबे, डॉ. सुजय विखे या वेळी उपस्थित होते.

या वेळी साहित्यिक रा. रं. बोराडे यांना एक लाख रुपयांचा धनादेश देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सकाळ’चे निवासी संपादक ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी लिहिलेल्या व सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे’ या पुस्तकासाठी पत्रकार लेखक पुरस्कार, बाबाराव मुसळे (झळाळ), कवी महेश लोंढे (निद्रानाशाची रोजनिशी), हेरंब कुलकर्णी (शिक्षकांसाठी साने गुरुजी) यांना साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, अभिनेते मिलिंद शिंदे यांना कला, कीर्तनकार श्‍यामसुंदर सोन्नर यांना समाजप्रबोधन, तर दत्ता पाटील यांना नाट्यसेवेबद्दल पुरस्कार बहाल करण्यात आले.

पत्रकारांनी साहित्य निर्मिती देखील करायला हवी. ‘सकाळ’चे निवासी संपादक ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी कारभारी जिल्ह्याचे हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक एका अर्थाने नगर जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. त्याची दखल घेत, यंदाच्या वर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेला पत्रकार लेखक पुरस्कार या पुस्तकाचे लेखक डॉ. बोठे पाटील यांना देण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.

 

इतर बातम्या
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तनलिंगदेव, जि. नगर : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड (ता...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त...वर्धा : जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...