agriculture news in Marathi, Dr. vijay bharkar says new research required in agri field, Maharashtra | Agrowon

कृषी क्षेत्रात नव्याने संशोधन गरजेचे : डॉ. विजय भटकर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

राहुरी विद्यापीठ, जि. नगर : आजच्या पिढीला हवे व गरजेचे असलेले संशोधन झपाट्याने कालबाह्य होत असून हे संशोधन केवळ अत्यल्प काळामध्येच कालबाह्य होत असून नव्याने व कल्पनेपलीकडील संशोधन गरजेचे असून आजच्या पिढीसमोर हे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन नालंदा विद्यापीठाचे कुलपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. 

राहुरी विद्यापीठ, जि. नगर : आजच्या पिढीला हवे व गरजेचे असलेले संशोधन झपाट्याने कालबाह्य होत असून हे संशोधन केवळ अत्यल्प काळामध्येच कालबाह्य होत असून नव्याने व कल्पनेपलीकडील संशोधन गरजेचे असून आजच्या पिढीसमोर हे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन नालंदा विद्यापीठाचे कुलपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आयोजीत १२ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धा ‘आविष्कार-२०१७’ च्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. या वेळी व्यासपीठावर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, अविष्कारचे समन्वयक निरीक्षक डॉ. प्रमोद पाबरेकर, वित्त समिती समन्वयक विवेक साठे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जगन्नाथ पाटील, नियंत्रक विजय कोते, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके उपस्थित होते. 

डॉ. भटकर म्हणाले, की हवामान बदलांच्या आव्हानांना सामोरे जाऊनदेखील आपल्या देशाने कृषी उत्पादनात विविध विक्रम केले आहेत. तरुणांनी कृषी किंवा कृषी पूरक क्षेत्रात पुढे यावे. यापुढे कृषी क्षेत्रालाच भविष्य आहे. जगाच्या वेगवान आणि बदलत्या संस्कृतीत भविष्यात आपल्यासमोर बरेच आव्हाने येणार आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन संशोधन आणि कल्पकता हे शिक्षणाचा अविभाज्य भाग होणे गरजेचे आहे. या वेगवान बदलत्या युगात कृषिला माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्या. देशाचे भविष्य तरुणांच्या संशोधनावर अवलंबून आहे. अविष्कारसारखा उपक्रम तरुणांच्या संशोधन बुद्धीला चालना देईल.

अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू डॉ. विश्वनाथा म्हणाले, हे विद्यापीठ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. आत्तापर्यंत विद्यापीठाने एक लाख कृषी पदवीधर दिले आहेत. विविध पिकांचे २५७ वाण विकसित केलेले आहेत. देशातील डाळिंबाखालील ९० टक्के क्षेत्र हे या विद्यापीठान विकसित केलेल्या फुले भगवा वाणाखाली आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या उसाचा फुले २६५ या वाणाने राज्याला सात हजार करोड मिळून दिले आहे. विद्यापीठाच्या संशोधनाने शेतकऱ्यांचा कायापालट केला आहे.

सूत्रसंचालन प्रेमराज चव्हाण यांनी केले. आभार कुलसचिव पवार यांनी मानले. निरीक्षक ईश्वर मोहरले, प्रशांत गावंडे, अनिता रविकुमार, श्रीकांत पाटील, सर्व कृषी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

इतर अॅग्रो विशेष
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
फळपिकांसह एकत्रित क्रॉपसॅप योजना...मुंबई : राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील...
‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक...मुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत...
‘वनामकृवि’ कुलगुरू पदासाठी उद्या मुलाखतीपरभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सिंचनक्षमता बळकट करून फळबागशेती केली...केळीचे मुख्य पीक, त्याचे निर्यातक्षम उत्पादन,...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांच्या ‘डिमोशन’ला...अकोला ः सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर...
फळबाग शेती, रायपनिंग चेंबर, थेट विक्रीडोंगरकडा (जि. हिंगोली) येथील वयाच्या पासष्टीमध्ये...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...