‘पंदेकृवि’च्या कुलगुरुपदी डॉ. विलास भाले
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 सप्टेंबर 2017

मुंबई/अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी शनिवारी (ता.२३) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. विलास मधुकरराव भाले यांची नियुक्ती जाहीर केली. 

मुंबई/अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी शनिवारी (ता.२३) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. विलास मधुकरराव भाले यांची नियुक्ती जाहीर केली. 

डॉ. विलास भाले हे सध्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या दिवसांपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. यामुळे गेले काही दिवस लागलेली या नियुक्तीबाबतची उत्सुकता पूर्ण झाली. डॉ. रविप्रकाश दाणी यांना नागरिकत्वाच्या मुद्यावर राज्यपालांनी पदमुक्तीची कारवाई केल्यानंतर परभणीचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू विद्यापीठाचा पदभार पाहत अाहेत. अाता नवीन कुलगुरुपदी डॉ. भाले यांची पूर्णवेळ नियुक्ती झाली आहे. 

कुलगुरुपदाच्या व्यक्तीची निवड करण्यासाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कुलगुरू शोध समितीचे गठण करून पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. कुलगुरू शोध समिती सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हेमंत एल. गोखले यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झाली होती. या समितीत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिदेशक त्रिलोचन महापात्रा आणि राज्याचे कृषी व पणन खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार हे दोन सदस्य होते.

या समितीने पात्र व्यक्तींचे अर्ज मागविले असता २२ जणांनी अर्ज केले. त्यातून अंतिम पाचमध्ये विद्यापीठाचे अधिष्ठाता डाॅ. विलास भाले, दापोलीचे डाॅ. यू. व्ही. महाडकर, अमरावती येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले,  डाॅ. ए. के. चौधरी,  डाॅ. वीरेंद्रकुमार सिंग या पाच जणांना शुक्रवारी राज्यपालांनी सादरीकरणासाठी बोलावले होते. त्यातून डॉ. भाले यांच्या नावाची जवळपास दहा दिवसांनंतर घोषणा करण्यात अाली. 

कुलगुरुंसमोर असंख्य अाव्हाने
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कारभार विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये चालतो. अमरावती व नागपूर या दोन विभागांची पीकपद्धती वेगवेगळी असून त्यादृष्टीने संशोधन, वाण, तंत्र देण्याची जबाबदारी कुलगुरू या नेतृत्वाकडे येते. सध्या विद्यापीठाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप तसेच अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली अाहे. हे प्रकार थांबविताना विद्यापीठाच्या संशोधनाची दिशा ठरविण्याची जबाबदारी या कुलगुरुंच्या खांद्यावर येणार अाहे.

शेतकरी अात्महत्यांचा हा प्रदेश सातत्याने देशभर चर्चेत असतो. विविध पॅकेज, कर्जमाफी देऊनही शेतकरी अात्महत्यांवर नियंत्रण मिळवता अालेले नाही. विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे अाहे, अशा प्रकारच्या टीकांना सामोरे जावे लागत अाहे. एकूणच याला छेद देत नव्या उमेदीने या विद्यापीठाचा थेट शेतकऱ्यांना उपयोग कसा होईल याची जबाबदारी नव्या कुलगुरुंना स्वीकारावी लागणार अाहे. 

प्रदीर्घ अनुभव
डॉ. विलास भाले यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५७ मध्ये झाला. त्यांनी १९९२ मध्ये गांधी कृषी विज्ञान केंद्र (जीकेव्हीके), बंगळूर येथून ‘अॅग्रोनोमी’ या विषयात पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन आणि कृषी विस्तार शिक्षण क्षेत्रात एकूण ३७ वर्षांचा अनुभव आहे.डॉ. विलास भाले यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांची संशोधन प्रकाशने प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. भाले हे इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रोनोमी या संस्थेचे फेलो अाहेत. त्यांना ‘डॉ. अब्दुल कलाम जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ उमेदवारांनी पीएचडी प्राप्त केली आहे. डॉ. विलास भाले यांनी १३ पुस्तके लिहिली अाहेत.

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...