agriculture news in Marathi, Dr. Vinay Supe says understand structure of pomegranate trees, Maharashtra | Agrowon

डाळिंबाच्या झाडाची शरीरक्रिया समजून काम करा ः डॉ. विनय सुपे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जानेवारी 2018

डाळींब संघ अधीवेशन

डाळींब संघ अधीवेशन

पुणे ः डाळिंबाच्या झाडाची शरीरक्रिया समजून काम करा, झाडाच्या शरीरक्रियेविरुद्ध काम करू नका, काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा होण्यासाठी पानगळ महत्त्वाची आहे, पण डाळिंबाच्या झाडाची नैसर्गिक पानगळ होऊद्या. विनाकारण स्वतःहून पानगळ करू नका, स्वतःहून झाडाची क्रयशक्ती कमी करू नका, असे आवाहन पुण्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे यांनी शनिवारी (ता. ६) येथे सांगितले. यासह डाळिंबाच्या उत्पादनवाढीत महत्त्वाच्या अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली मते मांडली.

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या वतीने आयोजित डाळिंब अधिवेशनात ‘डाळिंबाची शरीरक्रिया’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. सुपे बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. सुपे म्हणाले, की झाडाच्या शरीरवाढीमध्ये मुळांचे कार्य, प्रकाश संश्‍लेषण क्रिया, श्‍वसन, बाष्पीभवन-स्वेद, रंध्रांचे कार्य याला महत्त्व आहे. डाळिंबाची हलकी छाटणी असावी, झाडाचा मध्यभाग खुला असावा, ते अधिक पसरते असावे, त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळायला हवा. फळे तोडणी झाल्यावर ७-८ दिवसांनी १ः२.५ः२.५ नत्र, स्फुरद, पालाश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी, मातीच्या मगदुरानुसार ३० ते ४५ दिवस पाणी द्यावे, कमीत कमी ६०-६५ दिवस बागेस विश्रांती द्यावी. 

‘‘मुळे आणि पाने ही झाडाच्या श्‍वसनाची महत्त्वाची स्थाने आहेत. मुळांना श्‍वसनासाठी ऑक्‍सिजन आवश्‍यक आहे. 
मातीच्या कणांमधील मोकळ्या जागांमधून ऑक्‍सिजन मिळतो. केशमुळे जमिनीतील ऑक्‍सिजन घेऊन इतर पेशींना पुरवतात. तर पाने ही रंध्राद्वारे श्‍वसन करतात. डाळिंब झाडाच्या या सगळ्या शरीरक्रियेची माहिती समजून घेऊन शेतकऱ्यानी काम करावे,’’ असेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी डाळिंबाच्या उत्पादनातील काही तांत्रिक गोष्टीही समजावून सांगितल्या. 

डॉ. सुपे म्हणाले...

  • स्वतःहून पानगळ नको, नैसर्गिक पानगळ होऊद्या
  • झाडांची हलकी छाटणी करा
  • झाड पसरते ठेवा, भरपूर सूर्यप्रकाश मिळू द्या
  • मुळे आणि पाने झाडाच्या श्‍वसनाची महत्त्वाची स्थाने

इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...
फ्लाय अॅशपासून कॉंक्रिटची निर्मिती शक्यसध्या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या फ्लाय ॲशपासून अधिक...