agriculture news in Marathi, Drains acquired in Yavatmal district have fallen | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात अधिग्रहित विहिरींना पडली कोरड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरींनाच कोरड पडल्याने अनेक गावांंतील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण कायम आहे. उमरखेड तालुक्‍यातील ५५ गावांत ६६ विहिरींचे अधिग्रहण पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात आले. 

उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरींनाच कोरड पडल्याने अनेक गावांंतील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण कायम आहे. उमरखेड तालुक्‍यातील ५५ गावांत ६६ विहिरींचे अधिग्रहण पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात आले. 

उन्हाळा, पाणीटंचाई आणि राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या रोजगाराची सोय असे समीकरणच रूढ झाले आहे. पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडविल्यास टॅंकरमाफिया आणि आपल्याच जवळच्या कार्यकर्ते, नातेवाइकांची विहीर अधिग्रहण करता येणार नाही. असे झाल्यास हे बेरोजगार होतील, हे लोकप्रतिनिधींना माहिती आहे. त्यामुळेच पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांत ठोस प्रयत्न झाले नाही, असा आरोप आहे. उमरखेड तालुक्‍यात तर अधिग्रहित विहिरींनाच कोरड पडली आहे. भवानी गाव हे त्याचे आदर्श उदाहरण म्हणून समोर आले आहे. भवानी येथे अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरीवरून १५ ते २० दिवस पाणीपुरवठा झाला. त्यानंतर मात्र गावातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली.

भवानीप्रमाणेच तरोडा, हिरामननगर, दिघडी, पोफाळी, ईसापूर, पिंपळदरी, खेडी, धानोरा, घडोळी, चालगणी, वालतूर, परजना, नागेशवाडी, गोकूळनगर, सुकळी (ज.) मानकेश्‍वर, चिंचोली संगम, अकोली, ढाणकी, बोरीवन, हातला, पिंपळगाव (वन), दिघडी, धनज, अमानपूर, मुळावा, बिटरगाव, टाकळी रा., चुरमुरा, जनुना, चातारी, कुपटी या गावातील अधिग्रहित विहिरींना देखील पाणी नसल्याचे किंवा कमी प्रमाणात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

एका विहिरीसाठी १८ हजारांची अदायगी
प्रशासनाकडून ५५ गावासाठी ६६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एका विहिरीकरिता १८ हजार रुपये महिन्याला शुल्कापोटी द्यावे लागतात. विशेष म्हणजे बहुतांश अधिग्रहित विहिरी या लोकप्रतिनिधी किंवा ग्रामपंचायत सदस्यांच्या जवळच्या नातेवाइकांच्याच असल्याचे सांगितले जाते. त्यांना लाभ पोचावा याकरिता प्रयत्न झाल्याने सामान्यांच्या हिताचा कोणताच विचार करण्यात आला नाही, अशी टीका ग्रामस्थ करीत आहेत.

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...