agriculture news in marathi, draw for foreign tour, nagar, pune | Agrowon

परदेश दौऱ्याकरिता शेतकरी निश्‍चितीसाठी नगरमध्ये सोडत
सुर्यकांत नेटके
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017
नगर : शेती अभ्यासाकरिता परदेश दौऱ्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केलेल्या आणि त्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड यादी मंगळवारी (ता. १७) निश्‍चित केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे. 
 
नगर : शेती अभ्यासाकरिता परदेश दौऱ्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केलेल्या आणि त्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड यादी मंगळवारी (ता. १७) निश्‍चित केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे. 
 
कृषी विभागाच्या मदतीने इस्राईल व अन्य देशांतील सुधारित शेतीचा अभ्यास करण्याची संधी राज्यातील शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना परदेशात जाण्याची संधी दिली जाते. त्यासाठी कृषी विभागातर्फे ५० टक्के अनुदान दिले जाते. त्यासाठी जिल्हाभरातील सुमारे २९९ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले होते. त्या अर्जांची छाननी केली असता विविध कारणांमुळे ३९ शेतकरी अपात्र ठरले, तर ३३ शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्या. त्रुटी पूर्ण करण्यासाठी मुदत दिली. 
 
दोन दिवसांत त्रुटी पूर्ण करून घेतल्या जातील. जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांची सोडत काढून एकत्र पात्रता यादी निश्‍चित केली जाणार आहे. त्यानंतर ती यादी कृषी सहसंचालकांकडे पाठवली जाणार आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. १७) जिल्हाधिकारी अभय महाजन व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात सकाळी दहा वाजता सोडत काढली जाणार आहे. या वेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी केले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...