agriculture news in marathi, drip compulsory to agriculture water societies | Agrowon

पाणीवापर संस्थांना ठिबक सिंचनाची अट
सिद्धेश्‍वर डुकरे
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

मुंबई : ठिबक सिंचन पद्धतीनेच शेतीला पाणी देण्याची अट बंधनकारक करत शेतकरी पाणीवापर संस्थांना परवाने देण्याचे धोरण जलसंपदा विभागाने अवलंबले आहे. यादृष्टीने कोयना, कृष्णा आणि टेंभू या उपसा सिंचन योजनांत प्रायोगिक पातळीवर याची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यानंतरच परवाने दिले जाणार आहेत. 

मुंबई : ठिबक सिंचन पद्धतीनेच शेतीला पाणी देण्याची अट बंधनकारक करत शेतकरी पाणीवापर संस्थांना परवाने देण्याचे धोरण जलसंपदा विभागाने अवलंबले आहे. यादृष्टीने कोयना, कृष्णा आणि टेंभू या उपसा सिंचन योजनांत प्रायोगिक पातळीवर याची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यानंतरच परवाने दिले जाणार आहेत. 

मान्सूनचा लहरीपणा, भूगर्भातील पाण्याची दिवसेंदिवस खालावत जाणारी पातळी, नगदी पिके घेताना पाण्याचा केलेला बेसुमार वापर आदींमुळे शेती आणि सिंचनात अनेक समस्य उद्‌भवतात. यामुळे पाणीवापराचे काटेकोर नियोजन, पाण्याची बचत, आवश्‍यक तेवढ्याच पाण्याचा वापर करून पिके घेण्यावर भर देण्यासाठी जलसंपदा विभागाने पाणीवापर परवाने देताना काही अटी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी आणि त्यांच्या संस्थांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढवला पाहिजे, हा यामागील प्रमुख हेतू आहे. 

कृष्णा, कोयना आणि टेंभू या सिंचन योजनांतील पाण्याचा उपयोग अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतीसाठी करण्यात येतो. सांगलीतील जत, कवठेमहांकाळ तसेच खानापूर, आटपाडी तर साताऱ्यातील फलटण, दहीवडी, खटाव आणि सोलापुरातील सांगोला, माळशिरस आदी भागांत या योजनांतील पाण्याचा वापर शेतकरी करतात. शेतीला हे पाणी वापरताना फळबागा आणि ऊस पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे सक्‍तीचे करण्यात आले आहे. 

- 48 टीएमसी पाणी मिळणार 
- अडीच लाख हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार 
- सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार 
- या योजनांतील सध्याचे शेतीचे उत्पन्न तीन हजार कोटी. 

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...