agriculture news in marathi, drip distributor issue reached to agriculture minister, Maharashtra | Agrowon

ठिबक वितरकांचा वाद कृषिमंत्र्यांपर्यंत पोचला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

पुणे : कृषी खात्याच्या मूळ कामकाजाशी कोणताही संबंध नसतानाही वितरकांना नोंदणीची सक्ती केली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र ड्रिप डिलर असोसिएशनने कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

पुणे : कृषी खात्याच्या मूळ कामकाजाशी कोणताही संबंध नसतानाही वितरकांना नोंदणीची सक्ती केली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र ड्रिप डिलर असोसिएशनने कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

"वितरकांचे काय म्हणणे आहे हे समजावून घ्या. हटवादी भूमिका न घेता हा प्रश्न सोडवा अशा सूचना कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत दिल्या आहेत, असे असोसिएशनचे सचिव संजीव माने यांनी सांगितले. 
राज्यातील ठिबक कंपनीकडून वितरकांना केलेला पुरवठा आणि या वितरकांनी पुढे शेतकऱ्यांना केलेली विक्री याचा कुठेही ताळमेळ नसल्याचा दावा कृषी खात्याचा आहे. ठिबकसाठी वाटलेल्या अनुदानाचा हिशेब केलेल्या विक्रीशी जुळला पाहिजे, असा आग्रह धरीत कृषी खात्याने वितरकांकडून स्टॉक व सेल स्टेटमेंटची मागणी केलेली आहे.  

वितरकांनी मात्र कोणतेही स्टेटमेंट देण्यास ठाम विरोध केलेला आहे. "पुरवठ्यानुसार ड्रीप संचावर शेतकऱ्यांना वेळोवेळी अनुदान दिले गेले नाही. कृषी खात्यानेच एका वर्षीचे प्रस्ताव दुसऱ्या वर्षात भरण्यास वितरकांना भाग पाडले. त्यामुळे आमच्याकडे न जुळणाऱ्या स्टॉक स्टेटमेंटची माहिती मागितली जात आहे, असे वितरकांचे म्हणणे आहे. 

"राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना सविस्तर या विषयाची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय टाकून आम्हाला भेटीची वेळ दिली होती. तथापि, मुख्यमंत्री व्यस्त असल्याने भेट झाली नाही. ही भेट आता येत्या १८ सप्टेंबरला होईल, अशी माहिती श्री. माने यांनी दिली. 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...