agriculture news in marathi, drip irrigation online forms will be received, AGROWON effect | Agrowon

तुषार, ठिबकचे प्रस्ताव स्वीकारण्यास प्रारंभ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

अकोला  ः एक जुलैपूर्वी ठिबक व तुषार संच खरेदी करून अाॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव जीएसटीमुळे स्वीकारले जात नव्हते. मात्र कृषी अायुक्तांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्हिडिअो काॅन्फरन्समध्ये याबाबत मिळालेल्या सूचनांनंतर यंत्रणांनी प्रस्ताव स्वीकारणे सुरू केले. ‘अॅग्रोवन’मध्ये २३ अाॅक्टोबरच्या अंकात याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेत तातडीने तोडगा काढण्यात अाला असून हजारो प्रस्तावांचा मार्ग सुकर झाला आहे.

अकोला  ः एक जुलैपूर्वी ठिबक व तुषार संच खरेदी करून अाॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव जीएसटीमुळे स्वीकारले जात नव्हते. मात्र कृषी अायुक्तांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्हिडिअो काॅन्फरन्समध्ये याबाबत मिळालेल्या सूचनांनंतर यंत्रणांनी प्रस्ताव स्वीकारणे सुरू केले. ‘अॅग्रोवन’मध्ये २३ अाॅक्टोबरच्या अंकात याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेत तातडीने तोडगा काढण्यात अाला असून हजारो प्रस्तावांचा मार्ग सुकर झाला आहे.

या हंगामात शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन संच जुलैपूर्वी खरेदी केले होते. तत्पूर्वी व्हॅट करप्रणाली होती. परंतु जुलैपासून जीएसटी लागू झाली. त्यातच सूक्ष्म सिंचनाच्या निधीला काही ठिकाणी जुलै, काही जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात मंजुरी देण्यात आली. त्यामुळे प्रस्ताव घेताना जीएसटीचे बील जोडण्याची सक्ती करण्यात येऊ लागली होती. वास्तविक जुलैपूर्वी ही करप्रणाली नसल्याने विक्रेत्यांनी जीएसटीचे बिल दिले नव्हते. या तांत्रिक अडचणीमुळे हजारो शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी करूनही त्यांचे प्रस्ताव बाद होण्याची भीती तयार झाली होती.

शेतकरी वेळोवेळी तालुका कृषी कायार्लयामध्ये जाऊन प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती करीत होते. मात्र अधिकारी जीएसटीच्या बिलावर अ़डकले होते. यातून कुठलाही तोडगा निघत नव्हता. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे याबाबत मार्गदर्शन मागितले होते. त्यातच आॅक्टोबरअखेर प्रस्ताव निकाली न निघाल्यास शासनाच्या साईटवरून शेतकऱ्यांची नावे बाद होण्याची शक्यता वाढली होती. ‘अॅग्रोवन’ने वृत्त प्रकाशित करताच वरिष्ठांनी दखल घेऊन प्रस्ताव स्वीकारण्याची अनुमती दिली. 

एक जुलैपूर्वी आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनाचे प्रस्ताव व्हॅटच्या बिलासह स्वीकारण्याबाबत वरिष्ठांनी अनुमती दिली असून प्रस्ताव स्वीकारले जात असल्याचे तेल्हारा तालुक्याचे प्रभागी कृषी अधिकारी अविनाश मेश्राम यांनी सांगितले. या एकाच तालुक्यात सुमारे १४१० प्रस्ताव व्हॅट की जीएसटी अशा चक्रात अडकले होते. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाच्या प्रस्तावांची संख्या हजारोमध्ये होती. अनुमती मिळाल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अाहे.

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...