agriculture news in marathi, drip irrigation project inauguration, gadchiroli, maharashtra | Agrowon

लेखामेंढा शेतीक्षेत्रातही वेगळे अस्तित्व जपेल ः जिल्हाधिकारी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

गडचिरोली  ः सामाजिक उपक्रमात वेगळेपण जपणाऱ्या लेखामेंढा गावाने केवळ राज्यच नाही, तर देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक पुढाकाराने दुर्गम भागातील हे गाव नावारुपास आले. येत्या काळात ग्रामविकासासोबतच शेती क्षेत्रातही हे गाव आपले वेगळे अस्तित्व जपून नवी क्रांती घडवेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी व्यक्‍त केला.
 

गडचिरोली  ः सामाजिक उपक्रमात वेगळेपण जपणाऱ्या लेखामेंढा गावाने केवळ राज्यच नाही, तर देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक पुढाकाराने दुर्गम भागातील हे गाव नावारुपास आले. येत्या काळात ग्रामविकासासोबतच शेती क्षेत्रातही हे गाव आपले वेगळे अस्तित्व जपून नवी क्रांती घडवेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी व्यक्‍त केला.
 

केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्ह्यात लेखामेंढाचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत एक कोटी रुपयांच्या निधीतून या ठिकाणी कृषी विकासाला पूरक उपक्रम येत्या काळात राबविले जाणार आहेत. त्यातील १२७ हेक्‍टरवरील सूक्ष्म सिंचनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उदघाटन शेखरसिंह यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, समाजसेवक देवाजी तोफा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरडकर, कृषी विकास अधिकारी कोळप, तहसीलदार गणवीर, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. बोथीकर, तालुका कृषी अधिकारी बडवाईक, जयंत टेंभूर्णे, पानसे यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. या वेळी शेतीसोबतच वनसंपदेचा विचार करूनच विकासाची दिशा ठरवावी, असे मत श्री. गाडगीळ यांनी व्यक्‍त केले.
 

१२७ हेक्‍टरवर होणार सूक्ष्म सिंचन
गडचिरोली जिल्ह्यात सद्यःस्थितीत केवळ ९७ हेक्‍टरवर सूक्ष्म सिंचन आहे. या प्रकल्पातून एकट्या लेखामेंढा गावात १२७ हेक्‍टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावीत करण्यात आले आहे. त्यानंतर या भागात भाजीपाला लागवड, व्यावसायिक व नगदी पीक क्‍लस्टर निर्मितीचे काम होईल. प्रक्रिया उद्योगाची उभारणीदेखील या ठिकाणी करण्याचे प्रस्तावीत आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरडकर यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...