agriculture news in marathi, drip ragistration issue may solved, nagpur, maharashta | Agrowon

ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या बहिष्कारप्रकरणी तोडगा निघण्याचे सूतोवाच
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या बहिष्कारप्रकरणी कृषिमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा निघण्याचे सुतोवाच ड्रीप डिलर असोसिएशनने केले आहे. या संदर्भाने मंगळवारी (ता.१८) लातूर येथे बैठक पार पडली. बैठकीत राज्यभरातील विक्रेत्यांनी अपेक्षित कराराचा मसुदा तयार करीत तो मंजुरीसाठी फलोत्पादन संचालकांकडे सादर करण्याचा निर्णय घेतला.

नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या बहिष्कारप्रकरणी कृषिमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा निघण्याचे सुतोवाच ड्रीप डिलर असोसिएशनने केले आहे. या संदर्भाने मंगळवारी (ता.१८) लातूर येथे बैठक पार पडली. बैठकीत राज्यभरातील विक्रेत्यांनी अपेक्षित कराराचा मसुदा तयार करीत तो मंजुरीसाठी फलोत्पादन संचालकांकडे सादर करण्याचा निर्णय घेतला.

ठिबक संच विक्रेते आणि कृषी विभाग यांच्यात काही मुद्यावरून बेबनाव निर्माण झाला आहे. कृषी विभागाने २०१४-१५ पासून अनुदानावरील ठिबक संचाची झालेली विक्री आणि त्यापोटी विक्रेत्यांनी केलेल्या कराचा भरणा याबाबत पडताळणी सुरू केली आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याला चार्टर्ड अकौउंटट (लेखा परीक्षक) ची नेमणूक करण्यात आली असून विक्रेत्यांकडून अ, ब, क, ड, ई या फार्मेटमध्ये माहिती मागवण्यात आली आहे. प्रपत्रातील अ ते ड पर्यंतची माहिती भरण्यास विक्रेते राजी असून ‘ई’ प्रपत्रात त्यांनी विक्री केलेला माल तसेच कराचा केलेला भरणा याविषयीची पडताळणी केली जात आहे.

त्याकरिता २०१४-१५ पासूनचे दस्तऐवज व टॅक्‍स रिटर्न मागवण्यात आले आहेत. विक्रेत्यांनी मात्र २०१४-१५ च्या पडताळणीस विरोध करीत नव्या आर्थिक वर्षापासून कृषी विभागाला आवश्‍यक आणि हवे ते दस्तऐवज पुरविण्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. कृषी विभाग मात्र विक्रेत्यांची मागणी मान्य करीत नसल्याने अखेरीस राज्यभरातील विक्रेत्यांनी ठिबक नोंदणीवर बहिष्कार घातला होता. त्यानंतर याप्रकरणी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करीत कृषी आयुक्‍त, फलोत्पादन संचालक व ठिबक विक्रेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत ठिबक विक्रेत्यांच्या बहूतांश मागण्यावर सकारात्मक तोडगा काढण्यात आल्याचे सूत्र सांगतात.
 
विक्रेत्यांनी केला मसुदा तयार
कृषिमंत्र्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कृषी विभाग व ठिबक विक्रेते यांच्यात आता करार केला जाणार आहे. त्यात काय मुद्दे असावे यावर मंगळवारी (ता.१८) लातूर येथे ठिबक विक्रेत्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत मंथन झाले. संघटनेचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, सचिव संजीव माने यांच्यासह २४ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती. त्यानुसार कराराचा ड्राफ्ट तयार करण्यात आला असून फलोत्पादन संचालकांसमोर तो मांडला जाणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...