agriculture news in marathi, Drip Subsidy issue in maharashtra | Agrowon

सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

मुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या रखडलेल्या अनुदानाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी ऑक्टोबरअखेर उपलब्ध निधीपैकी ६० टक्के निधी शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले असताना, कृषी विभाग आतापर्यंत सुमारे २० टक्के निधी खर्च करू शकले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या ३१६ कोटींपैकी २० हजार ३०३ शेतकऱ्यांना ६२ कोटी ५९ लाख रुपये अनुदान वितरित झाले आहे. अद्यापही ७८ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 

मुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या रखडलेल्या अनुदानाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी ऑक्टोबरअखेर उपलब्ध निधीपैकी ६० टक्के निधी शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले असताना, कृषी विभाग आतापर्यंत सुमारे २० टक्के निधी खर्च करू शकले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या ३१६ कोटींपैकी २० हजार ३०३ शेतकऱ्यांना ६२ कोटी ५९ लाख रुपये अनुदान वितरित झाले आहे. अद्यापही ७८ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 

कृषी खात्यातील ऑनलाइनच्या सावळागोंधळामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सूक्ष्म सिंचन अनुदानाचे वितरण रखडले आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला होता. अनुदान वाटपातील हा सावळागोंधळ पाहून कृषी आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत परिपत्रकही जारी केले होते. सूक्ष्म सिंचनासह इतर काही योजनांसाठी उपलब्ध करून दिलेला निधी लक्ष्यांकानुसार खर्च झालेला नाही.

केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी ऑक्टोबर २०१७ अखेर साठ टक्के निधी खर्च होणे आवश्यक आहे. अन्यथा केंद्राकडून अनुदानाचा पुढील हप्ता उपलब्ध होणार नाही. याची सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी नोंद घेऊन सुटीच्या दिवशी काम करून आक्टोबरअखेर शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले होते. मात्र कृषी खात्याचा कारभार मागील पानावरून पुढे या पद्धतीने सुरू असल्याने अनुदान वाटप रखडल्याचेच दिसून येते. 

योजनेअंतर्गत आतापर्यंत २ लाख ४४ हजार २१५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ९८ हजार ६२६ शेतकऱ्यांनी संच बसवून अनुदानाची मागणी केली आहे. यातल्या ४८ हजार २९१ शेतकऱ्यांच्या शेतावर मोका तपासणी झाली आहे. तर २० हजार ३०३ शेतकऱ्यांना ६२ कोटी ५९ लाख रुपये अनुदान वितरित झाले आहे. याद्वारे १४ हजार ६१६ हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. मात्र कृषी खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे अद्यापही ७८ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच योजनेअंतर्गत उपलब्ध निधी खर्च झाल्यास त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर केंद्र-राज्याचे उर्वरित सुमारे ३०० कोटींचे अनुदान विभागाला मिळणार आहे. मात्र पहिला हप्ता अजून खर्च झाला नसल्याने आणि आक्टोबरची मुदतही संपल्याने उर्वरित सुमारे ३०० कोटींच्या अनुदानावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

३१६ कोटींपैकी फक्त ६२ कोटी खर्च
सूक्ष्म सिंचनासाठी केंद्र सरकारने राज्याला ३८० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. राज्य हिश्शाचे मिळून सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी एकंदरीत ६२० कोटी रुपये निधीची तरतूद उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी १९० कोटी केंद्र सरकारकडून राज्याला मिळाले आहेत. तर राज्य सरकारच्या वाट्याच्या १२६ कोटींची डीपीडीसीत तरतूद करण्यात आली आहे. असे एकंदर ३१६ कोटी रुपये अनुदान सध्या उपलब्ध आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...