agriculture news in marathi, Drone demonstration in Lodhaga, Latur, Maharashtra | Agrowon

ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल : डॉ. रेड्डी; लोदग्यात प्रात्याक्षिक
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे. यात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेवून बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेने ड्रोन विकसित केले आहेत. हे ड्रोन पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वास बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. के. पी. जे. रेड्डी यांनी व्यक्त केले.

लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे. यात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेवून बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेने ड्रोन विकसित केले आहेत. हे ड्रोन पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वास बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. के. पी. जे. रेड्डी यांनी व्यक्त केले.

लोदगा (ता. औसा) येथील सर छोटुराम कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतीय विज्ञान संस्था व फिनिक्स फाऊंडेशन वतीने सोमवारी (ता. २४) कृषि ड्रोनची प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हे प्रात्याक्षिके पाहण्यासाठी जिल्ह्यातून शेतकरी आले होते. तसेच भारतीय विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. जी. गोपालन, एस. एन. ओमकार, केंद्र शासनाच्या नागरी उड्डायन मंत्रालयाचे उपसंचालक तुलसीरमन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे नवीद पटेल, महाराष्ट्र बांबू बोर्डाचे डॉ. थंग रेड्ड़ी, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदींची उपस्थिती होती. श्री. पटेल यांच्या पुढाकारातून या प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

शेतात तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय शेती सुधारणे अशक्य आहे. भारतीय विज्ञान संस्थेने हे ड्रोन विकसित केले आहे. या ड्रोनच्या सहाय्याने कोणते पीक किती एकरवर पेरले गेले आहे, याचा अचूक अंदाजे घेता येईल, कोणत्या पिकावर कोणती किड पडली आहे, याची माहिती मिळेल, शेतकऱयांनी कोणते पीक घेवू नये याची माहिती सांगता येईल, कोणत्या विभागात कोणते पीक घ्यावे याची माहिती सांगता येईल इतकेच नव्हे तर ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करणेही शक्य होणार आहे. इस्त्राईलमध्ये याचा सर्रास वापर केला जात आहे. तसाच वापर येथे व्हावा या करीता प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती श्री. रेड्डी यांनी दिली.

या ड्रोनच्या वापरासाठी भारतीय विज्ञान संस्था व राज्य शासन यांच्या करार होत आहे. दोन वर्ष याचा येथे वापर सुरु होईल, अशी माहिती श्री. गोपालन यांनी दिली. यातील एक ड्रोन ५० किलोमीटर तासी वेगाने वीस किलोमीटर परिसरातील शेतीवर निरक्षण करु शकते अशी माहिती श्री. ओमकार यांनी दिली. शेतीच्या क्षेत्राच्या विकसासाठी ड्रोन हा आशेचा किरण आहे, असे श्री. पटेल म्हणाले.

ड्रोनचा कायदा तयार:
केंद्र शासनाने ड्रोनचा कायदा तयार केला आहे. यात शेतीसाठी ड्रोनचा वापर
करायचा असेल तर त्याला तातडीने अॉनलाईन परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती नागरी उड्डायण मंत्रालयाचे उपसंचालक तुलसी रमण यांनी दिली. ड्रोनसाठी रेड, येलो व ग्रीन असे झोन तयार करण्यात आले आहेत. शेतीही ग्रीन झोनमध्ये येते. ड्रोनच्या उड्डानासाठी परवानगी आवश्यकच आहे. आॅनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. शेतीसाठी ती सहज उपलब्ध असणार आहे. ४०० मीटर उंचीपर्यंतच ड्रोन उडवता येणार आहे. विवाहसाठीच्या ड्रोनची ही मर्यादा २०० मीटर उंचीपर्यंतच आहे, असे ते म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...