agriculture news in Marathi, drought affected farmers on sugarcane choping, Maharashtra | Agrowon

दुष्काळग्रस्तांना ‘कोयत्या’चा आधार
सूर्यकांत नेटके
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

नगर जिल्ह्याचा पूर्व भाग, मराठवाडा, खानदेश भागातून यंदा मोठ्या प्रमाणात मजूर ऊसतोडणीसाठी निघाले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या सख्येत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना जनावरे जगवण्याची चिंता असल्याने याआधी कधीही ऊसतोडणी न केलेल्यांनी यंदा ऊसतोडणी करण्याची तयारी दर्शवली आहे.
- गहिनीनाथ पाटील थोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार, मजूर, मुकादम युनियन
 

नगर ः यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. खरीप पिके वाया गेली, रब्बीची आशाही संपली. चारा-पाण्याचा प्रश्‍न आताच गंभीर होत असल्याने जनावरे जगवायची चिंता असलेल्या दुष्काळी भागातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा ऊसतोडणीसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा राज्यभरात ऊसतोडणी मजुरांच्या संख्यते सुमारे तीस ते चाळीस टक्के म्हणजेच तीन लाखांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी सुमारे दीड लाखावर उसलेली उचल यंदा पन्नास हजारावर आली आहे. काही मजुरांनी तर त्याहीपेक्षा कमी पैशांत ऊसतोडणी करण्याची तयारी दर्शवली आहे. आताचा गावात पाणी प्यायला नसल्याने मजुरांचे वेगाने साखर करखान्याकडे स्थलांतर होत असल्याने दिवाळीच्या तोंडावर गावेही ओस पडू लागली आहे.

राज्यात आणि राज्याबाहेर जाणारे साधारणतः पंधरा लाख मजूर असतात. त्यातील दहा लाख मजूर राज्यातील दोनशे साखर कारखाना परिसरात ऊसतोडणी करतात. सर्वाधिक पाच ते सहा लाख मजूर बीड जिल्ह्यातील आहेत, तर त्याला जोडूनच असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, नेवासा. कर्जत तालुक्‍यांतील काही भागांतील मजूर ऊसतोडणी करतात. याशिवाय जळगाव, चाळीसगाव, जालना, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोलीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, साताऱ्याच्या दुष्काळी भागातील मजूरही ऊसतोडणी करू लागले आहेत.

मागील दोन वर्षांच्या काळात नगरसह राज्यातील पावसाची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे मजुरांच्या संख्येत पंधरा ते वीस टक्के घट झाली होती. यंदा मात्र परिस्थिती पुन्हा पालटली आहे. राज्यातल्या बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. पाऊस नसल्याने खरिपाची पिके वाया गेली; रब्बीतही परतीचा पाऊस नसल्याने पिके येतील याची शक्‍यता मावळली आहे. बाजरी नाही, ज्वारी जागेवरच करपत असल्याने चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. भरवशाच्या विहिरींनी सप्टेबर-आक्‍टोबरमध्येच तळ गाठल्याने पिण्याचे पाणी नाही, रोजगाराचे साधन नाही, अशा स्थितीत गावात राहायचे कसे, याची चिंता लागलेल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा ऊसतोडणीचा मार्ग पत्कारला आहे.

यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगितले जात असले, तरी हुमणीची बाधा, पाणी नसल्याने उत्पादनात घट या कारणाने सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील काही कारखाने साधारण पाच महिने तर नगर, मराठवाडा व अन्य भागातील कारखाने चार महिन्यांंपेक्षा जास्त काळ चालण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे मार्चनंतर गावी आलेल्या मजुरांच्या रोजगार, पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर होणार आहे.

उचलीत मोठी घट
मजुरांना दरवर्षी मुकादमामार्फत साखर कारखान्यांकडून आगाऊ रक्कम (उचल) दिली जाते. तरुण पिढी ऊसतोडणी करायला तयार नसल्याचे कारण पुढे येत असल्याने आपसूकच उचलीचे दर वाढून दीड लाखावर गेले. यंदा मात्र मजुरांची संख्या तीस ते पस्तीस टक्‍क्‍यांनी वाढली असल्याने मुकादम उचल द्यायला तयार नाहीत. गावांत राहून करायचे तरी काय असा, प्रश्‍न असलेल्या शेतकऱ्यांनी ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला असून, उचलीचे दर दीड लाखावरून पन्नास हजारावर आले आहेत. काही तरुणांनी तर त्याहीपेक्षा कमी रकमेवर ऊसतोडणी करण्याची तयारी दाखवत कारखाने गाठायला सुरवात केली आहे. 

बैलाचे दर वाढले
ऊसतोडणी कामगार ऊसवाहतुकीसाठी किमती बैलाची खरेदी करतात. बहुतांश जोड्या लाखाच्या घरात आहेत. यंदा तोडणी मजुरांची संख्या वाढल्याने बैलजोड्यांचे दर वीस टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. किमती बैलांसोबत इतर जनावरे जगवण्यासाठीच तोडणीला जाण्याचा अनेक सुशिक्षित तरुणांनी निर्णय घेतला आहे. शिवाय टायर  वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टरचाही वापर वाढू लागला आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...