agriculture news in Marathi, drought analysis report in final stage, Maharashtra | Agrowon

दुष्काळ मूल्यांकन अहवाल अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पुणे: राज्यातील दुष्काळी स्थितीची वस्तुस्थितीदर्शक माहिती घेऊन तयार केला जात असलेल्या दुष्काळ मूल्यांकन अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महसूल विभागाकडून अजूनही अर्धवट माहिती पाठविली जात असल्यामुळे अहवालाचे काम रेंगाळले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे: राज्यातील दुष्काळी स्थितीची वस्तुस्थितीदर्शक माहिती घेऊन तयार केला जात असलेल्या दुष्काळ मूल्यांकन अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महसूल विभागाकडून अजूनही अर्धवट माहिती पाठविली जात असल्यामुळे अहवालाचे काम रेंगाळले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

 राज्यात १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृशस्थिती शासनाने जाहीर केली आहे. मात्र, केवळ असे जाहीर केल्यामुळे केंद्र शासनाचा निधी मिळत नाही. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल उपयुक्त ठरतात. या अहवालांचे संकलन करून अंतिम अहवाल तयार करण्याची जबाबदारी राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आहे. मात्र, काही जिल्हे दुष्काळ निवारण व्यवस्थापनाच्या कामात पिछाडीवर असल्यामुळे समितीची कोंडी झाली आहे. 

"राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीचा अहवाल हाती आल्याशिवाय राज्यात कुठेही दुष्काळ घोषित करता येणार नाही. राज्य शासनाने यापूर्वी फक्त दुष्काळसदृशस्थिती जाहीर केली आहे.  या स्थितीचा नेमका अभ्यास करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तसेच राज्यस्तरीय देखरेख समितीची आहे," असे मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. "दुष्काळी स्थितीबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून ते मंत्रालयापर्यंत घमासान चर्चा सुरू आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत देखरेख समितीचा अहवाल मंत्रालयात पोचता करण्यासाठी आमची धावपळ सुरू आहे. पुणे, रायगड, वर्धा जिल्ह्यांतील काही माहिती समितीकडे आलेली नव्हती. महसूल विभागाला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, शासनाने दुष्काळसदृश स्थिती जाहीर केलेल्या १८० तालुक्यांमध्ये समाविष्ट असलेल्या एकूण गावांपैकी १० टक्के गावांमधील पिकांची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. रॅंडम पद्धतीने निवडलेल्या गावांपैकी प्रत्येक गावात पाच पिकांची ठिकाणे आम्ही निश्चित केलेली आहे. पीक कापणी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल अॅपमधील माहिती व छायाचित्रेदेखील उपयुक्त ठरणार आहेत. 

रॅंडम पद्धतीने निवडलेल्या गावांमधील वस्तुस्थिती (ग्राउंडट्रुथिंग) नमुन्यात भरण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. त्यासाठी शासनाने प्रपत्र क उपलब्ध करून दिलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अशी सर्व प्रपत्रांची माहिती तपासून राज्यस्तरीय समितीला पाठविली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दुष्काळी स्थिती आहे; पण अतिगंभीर नाही 
"राज्याच्या काही भागात दुष्काळाची तीव्रता आहे. मात्र, सर्व भागात म्हणजे १८० तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे म्हणता येणार नाही. कारण, वस्तुस्थितीदर्शक अहवालांसाठी उपलब्ध होणारी आकडेवारी बघता तसा निष्कर्ष काढता येत नाही,’’ असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

"राज्यातील खरीप पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी बघता जालना, औरंगाबाद, बीड, नगर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील काही भागांत उत्पादकता कमी आहे. मात्र, अमरावती, नागपूर, कोकण तसेच नाशिकच्या काही विभागांत पिकांची उत्पादकता चांगली आहे. कारण, ऑगस्ट अखेर खरीप हंगामात प्रत्यक्ष पेरणी झालेल्या क्षेत्राचे जर सामान्य क्षेत्राशी असलेले प्रमाण ८५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करावा लागेल. ७५ टक्क्यांपेक्षा पेरा कमी असेल तरच गंभीर दुष्काळ म्हणता येणार आहे.

याशिवाय सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणात नुकसानीचे अंदाजित प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास मध्यम आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्यास गंभीर दुष्काळ समजला जाईल. या निकषानुसार सर्व गावांमध्ये गंभीर दुष्काळ सध्या तरी दिसत नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...