दुष्काळी भागात दाहकता वाढली

दुष्काळी भागात दाहकता वाढली
दुष्काळी भागात दाहकता वाढली

सावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या सावळज पूर्व भागात सध्या भीषण दुष्काळी स्थिती उभी आहे. पावसाअभावी यंदा भागातील कोणताच तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. काही तलाव कोरडे, तर काही मृतसंचय साठ्याखाली आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न उभा आहे. साततच्या दुष्काळी स्थितीमुळे अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. रोजगाराचे प्रमुख केंद्र असणाऱ्या द्राक्ष बागाही पाणीटंचाईमुळे शेतकरी काढून टाकत आहेत.  तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेली तीन वर्षे नाममात्र पाऊस झाला आहे. सततच्या दुष्काळामुळे नदी, ओढे, नाले, बंधारे, तलाव, कोरडे आहेत. काही भागांत महिसाळ व विसापूर-पुनदी योजनेचे पाणी आले आहे. परंतु या योजना अल्प काळासाठी कार्यान्वित होत असल्याने योजनाचा म्हणावा तितकासा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही.  निवडणुकांच्या तोंडावर या योजना काही दिवस कार्यान्वित झाल्या; परंतु सध्या योजना बंद आहेत. उन्हाची दाहकता प्रचंड वाढली असून, नागरिकांचे पाणी व जनावराचे पाणी, चाराप्रश्न उभे असताना या योजना बंद राहिल्याने सर्वांची होरपळ होत आहे. २०१८ च्या पावसाळ्यात पाऊस नसल्याने खरीप व रब्बी वाया गेला आहे. पीकविमा ही समाधानकारक मिळालेले नाही. त्यामुळे खरीप व रब्बी शेतकरी हताश आहेत.  भागात द्राक्षाचे पीक मोठे आहे, परंतु पाणीटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा उखडून काढल्या आहेत. तसेच ज्यांच्या विहिरी, बोअर, आटल्या आहेत त्यांनी टॅंकरने विकतचे पाणी घेऊन बागा जागविण्याचा प्रयत्न चालविला आहे. अर्थकारणाचा केंद्र असणाऱ्या बागा संकटात सापडल्याने आर्थिक समीकरणे बदलत जात आहेत. दुष्काळाची दाहकता वाढली असताना लोकसभा निवडणुकांमुळे लोकप्रतिनिधींचे दुष्काळग्रस्तांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा निवडणुकांनतर आता तरी दुष्काळग्रस्तांच्या वेदनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भागातून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com